सोलापूर, पुढारी वृत्तसेवा: उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावामध्ये शेतातील शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन मुलींचा पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या. या घटनेत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सानिका सोनार (अंदाजे वय १७), पुजा सोनार (अंदाजे वय १३), आणि आकांक्षा युवराज वडजे (वय ११) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मार्डी गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात तीन मुली आज सकाळी पाणी पिण्यास गेल्या होत्या. याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि शेततळ्यात तिघींचा मृत्यू झाला.या घटनेने मार्डी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रानात जळण गोळा करायला गेल्या होत्या, तहान लागल्याने पाणी पिण्यास शेततळ्यात उतरल्या हाेत्या, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचलंत का?