Latest

PM Narendra Modi : अमृत पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘या’ पंच प्राणाचा संकल्प मोठे आव्हान; पंतप्रधान मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यामुळे येत्या २५ वर्षात अमृतपिढी निर्माण करणे आपल्यापुढील आव्हान असणार आहे. यासाठी विकसित भारताची निर्मिती, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारातून स्वातंत्र्य, वारशाचा अभिमान, एकता आणि नागरी कर्तव्ये या पंचप्राणाचा संकल्प करून तो प्रत्यक्षात आणणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हरियाणामध्ये देशातील प्रत्येक राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.

सध्या देशात ओणम, दसरा, दुर्गापूजा आणि दीपावली आणि छठपूजेसह अनेक सण उत्सव शांततेत आणि सौहार्दाने साजरे केले जात आहेत. आज देशात उत्सवाचे वातावरण आहे. हेच देशाची एकात्मता अधिक बळकट होत असल्याचे प्रतिबिंबित करते, असेही मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केले आहे.

आज जागतिक स्तरावर भारत जितक्या वेगाने प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने भारतापुढील आव्हानेही वाढणार आहेत. जगात अशा अनेक शक्ती आहेत, ज्यांना वाटते की, भारत आपल्या देशापेक्षा शक्तिशाली बनू नये. त्यामुळे सर्वकाही गोष्टींचा उपयोग करत देशविरोधी ज्या नकारत्मक शक्ती उभा राहत आहेत. या परिस्थितीत अशा गोष्टींना कठोरपणे सामोरे जात, देशातील नागरिकांची सुरक्षा करणे ही आपली जबाबदारी आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे 24*7 काम आहे. परंतु, कोणत्याही कामातील सतत सुरू असलेल्या प्रक्रियेत सुधारणा करत राहणे आणि त्या कामाला अधिक आधुनिक करणे आवश्यत आहे. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारद्वारे बनविल्या गेलेल्या कायद्यांमुळे देशातील कायदा सुव्यवस्था मजबूत केली आहे. याममध्ये दहशतवाद, हवाला नेटवर्क, भ्रष्टाचार यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या शक्ती पहायला मिळाल्या असून, लोकांचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या काही वर्षांत भारत सरकारच्या पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित सुधारणा झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT