Latest

India @75 : उषा मेहतांच्‍या ‘गुप्त रेडिओ’ने दिले हाेते इंग्रजांच्‍या अत्‍याचाराला ‘आव्‍हान’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आधूनिक तंत्रज्ञानामुळे आज रेडिओ तसेच व्हिडिओचे तंत्रज्ञान खूपच सुलभ झाले आहे. त्यामुळे आता कोणीही अगदी सहजपणे स्वतःचे रेडिओ (पॉडकास्ट) चालवू शकतात; पण 80 वर्षांपूर्वी जर तुम्हाला कोणी रेडिओ सुरू करण्याचे सांगितले असते आणि ते सुद्धा इंग्रजांना या स्टेशनचा पत्ता न लावता तर…खरोखरच हे एक प्रचंड आव्हानात्मक कार्य होते; पण आपल्या सहका-यांसोबत हे आव्हान पेलणा-या गांधीवादी कार्यकर्त्या 'उषा मेहता' यांनी ते अगदी सहज केले. सुमारे चार महिने इंग्रजांच्या नाकाखाली अतिशय गुप्तपणे 'काँग्रेस रेडिओ' त्यांनी चालवला.

14 ऑगस्ट 1942 ला डॉ. उषा मेहता यांनी आपल्या सहका-यांसह काँग्रेस रेडिओची पहिली घोषणा केली. ब्रिटिश अधिका-यांच्या कडक बंदोबस्तातही त्यांनी ब्रिटिश शासनद्वारा भारतीय लोकांवर केल्या जाणा-या अत्याचारांची सूचना देणे जारी ठेवले. भारत छोडो आंदोलना दरम्यान त्यांनी सुमारे 7-8 वेळा रेडिओ स्टेशन बदलले. 12 नोव्हेंबर 1942 ला जेव्हा गिरगाव येथे एक शो होस्ट करत होत्या तेव्हा इंग्रज पोलिसांना याचा सुगावा लागला त्यांनी उषा यांना आणि त्यांच्या सहका-यांसह पकडले. यासाठी त्यांना सुमारे 4 वर्षे तुरुंगवास सोसावा लागला हाेता.

वयाच्‍या आठव्‍या वर्षी आंदाेलनात सहभाग

उषा मेहता यांचा जन्म 25 मार्च 1920 रोजी गुजरात राज्यात सूरतमधील सरस गावात झाला होता. त्या लहानपणापासूनच महात्मा गांधीजींच्या अहिंसक चळवळीने प्रभावित होत्या. 1928 मध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी सायमन कमिशनविरोधातील आपल्या पहिल्या आंदाेलनात भाग घेतला होता.  एका मुलाखतीमध्ये त्यांनी समुद्राचे पाणी घरी आणून त्यापासून मीठ उत्पादन करण्याचा किस्सा सांगितला होता. मात्र उषा यांच्या घरातून या सगळ्या गोष्टींना विरोध होता. कारण त्यांचे वडील ब्रिटीश शासनात न्यायाधीश पदावर होते. लहानपणी त्या तुरुंगात बंद केलेल्या लोकांना संदेश वाहक म्हणूनही कार्य करत असत.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी गांधीवादावर पीएचडी केली. नंतर विल्सन महाविद्यालयात राजनीती विषयाच्या शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली. तसेच त्या गांधी पीस फाउंडेशनच्या अध्यक्ष देखील राहिल्या. 1998 मध्ये त्यांना भारत सरकारद्वारा पद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आले हाेते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT