Latest

कुमार केतकर : ‘देवेंद्र फडणवीसांपासून महाविकास आघाडीला कोणताच धोका नाही’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापन केली, तर पंजाबमध्ये धुळदाण झाली. दरम्यान, या निकालाचे महाराष्ट्रातही पडसाद उमटणार का ? राज्यातील भाजप नेते महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करणार का ? याची चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही रोख निकालानंतर महाराष्ट्राकडे राहिल्याने चर्चांना आणखी वेग आला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट यावी यासाठी दबावतंत्राचा वापर करू शकते असे नमूद केले. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून नेत्यांवर दबाव आणून राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अस्थिरता निर्माण करण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर केला जाईल आणि अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती राष्ट्रपती राजवटीचा विचार केला जाईल.

देवेंद्र फडणीवासांची कोणतीच भीती नाही

देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारला डोकेदुखी ठरत आहे असे वाटते का ? असे विचारले असता कोणतीही भीती नसल्याच्या केतकर यांनी दावा केला. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना योग्य उत्तर दिलं असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांच्यापासून महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षाला नेतृत्व उभं करता आलेलं नाही. त्यांना बहुमत मिळू शकेल असा कोणताही विश्वास नसल्याचे केतकर यांनी नमूद केले.

नेते दबावात आहेत असे वाटत नाही

महाविकास आघाडी सरकारमधील नेते तपास यंत्रणांच्या भितीने दबावाखाली आहेत का ? असे विचारले असता केतकर यांनी तसे वाटत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील नेते बोलत आहेत. संजय राऊत जोरदार बोलत आहेत. आदित्य ठाकरे बोलत आहेत. जयंत पाटील बोलत आहेत, इतरही सगळेजण बोलत आहेत. नेत्यांमध्ये कोणतीही गडबड नाही. केंद्र सरकारचे डावपेच घाबरवून, अस्थिरता निर्माण करून राष्ट्रपती राजवट आणण्याचे प्रयत्न आहेत.

काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा

पाच राज्यांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा बदलाची चर्चा सुरु झाली आहे, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अधिक प्रतिक्रिया न देता मी कार्यकारी समितीमध्ये नसून आजच्या होणाऱ्या बैठकीकडे लक्ष असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT