सामंथा- नागा 
Latest

सामंथा- नागा चैतन्य घटस्फोटाच्या एका वर्षानंतर येणार एकत्र!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आगामी 'यशोदा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'यशोदा' या चित्रपटाबद्दल चाहत्यांची संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सिनेमागृहात येवून एकच दिवस झाले नाही तोपर्यत चित्रपट हिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच दरम्यान सामंथा आणि तिचा पहिला पती नागा चैतन्य हे घटस्फोटोच्या एका वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची माहिती मिळत आहे. सामंथाची याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. (सामंथा- नागा )

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यशोदाच्या अगोदर पुष्पा चित्रपटातील 'ऊं अंटावा' गाण्याने प्रकाश झोतात आली होती. यानंतर ती हळहळू सोशल मीडियावरूनदेखील दूर गेली. चाहत्यांनी मध्यंतरी सांमथाने चित्रपटात का दिसत नाही असे बोलेले जात होते. याच दरम्यान सांमथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मायोसिटिसच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. यानंतर सर्व चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली होती. याच दरम्यान, सामंथाचा पहिला पती नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांनी तिच्या तब्येत विचारपूस केली होती. तसेच नागा चैतन्यदेखील तिच्याशी फोनवरून संपर्कात असतो. सध्या दोघांच्यात चांगली मैत्री झाली आहे. यामुळेच सांमथा आणि नागा घटस्फोटोच्या एक वर्षानंतर एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबबात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य दोघांचा घटस्फोटोला जवळपास एक वर्ष उलटले आहेत. घटस्फोटोनंतरदेखील दोघेजण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पर्सनल लाईफ बाजूला ठेवून त्यांनी प्रोफेशनली एकमेकांसोबत राहण्याचा मार्ग निवडला आहे. याच दरम्यान सामंथा आणि नागा यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार असल्याचे माहिती मिळतेय. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना खूपच पंसतीस उतरते.

सामंथा- नागा चैतन्य यांनी २०१० मध्ये एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांचा २९ जानेवारी २०१७ रोजी हैदराबादमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर सामंथाने सोशल मीडियावर तिच्या नावासोबत 'अक्किनेनी' असे नाव जोडले होते, परंतु, काही दिवसानंतर तिने हे आडनाव काढून टाकले आणि दोघेजण विभक्त होत असल्याचे वृत्त समोर आलं. यानंतर सांमथा आणि नागाने २ ऑक्टोबर २०२१ रोजी रितसर दोघांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. यानंतर सांमथा सोशल मीडियावर फारशी दिसली नाही. आणि एक दिवस तिने मायोसिटिस आजाराने ग्रस्त असून परदेशात उपचार घेत असल्याची माहित दिली. या माहितीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती विजय देवरकोंडासोबत 'कुशी'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT