पुढारी ऑनलाईन : इकॉनिमस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थेने २०२१साठी Worldwide Cost of Living Index जाहीर केले आहे. या इंडेक्सनुसार तेल अविव राहाण्यासाठी जगातील सर्वांत महाग शहर ठरले आहे. कोरोनाचा प्रभाव आणि त्यामुळे जगभरातील आर्थिक गणित कोलमडली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
२०२० साली तेल अविवचा पाचव्या क्रमांकावर होते. या यादीत १७३ शहरांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार क्रमवारी निश्चित केली जाते. रोजच्या गरजेच्या २०० वस्तू आणि सेवांचे दर विचारात घेऊन हा इंडेक्स बनवला जातो. न्यू यॉर्क शहरातील दर हे पायाभूत मानले जाऊन हा निष्कर्ष काढला जातो.
पॅरिस आणि सिंगापूर क्रमांक २ वर आहेत. झुरिक क्रमांक ४ वर, हॉगकाँग क्रमांक ५ वर आहे. त्यानंतर हाँगकाँग, न्यू यॉर्क, जेनेव्हा, कोपनहेगन, लॉस एंजेलिस, ओसाका, ओस्लो, सोल, टोकोयो, सिडनी, मेलबर्न ही शहर आहेत. हेलसिंकी आणि लंडन एकत्रित १७व्या क्रमांकावर आहेत. तर डब्लिन, फ्रँकफर्ट, शांघाय एकत्र १९ व्या नंबर वर आहेत.
सिरियाची राजधानी दमास्कस हे राहण्यासाठी सर्वांत स्वस्त शहर आहे. स्वस्त शहरात. ट्रायपोली, ताश्कंद, ट्युनिस, अलमाटी, कराची, अहमदाबाद, अल्गेरिस, ब्युनोस, लुसाका या शहरांचा क्रमांक लागतो.
हाँगकाँगमध्ये पेट्रोलच्या किमती जगात सर्वांत जास्त आहेत.
कोरोनामुळे महागाई वाढल्याचा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. संस्थेने म्हटले आहे, "कोरोनामुळे जगात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन होते. पण लस उलपब्ध झाल्याने अर्थव्यवस्था सावरत आहे. पण काही शहरांत पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवा यांचं वितरण विस्कळित होत असून त्यामुळे किमतीही वाढत आहेत."
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ – जाणून घ्या ओमायक्रॉन विषाणूबद्दल