Latest

प्रेमाची ‘अंब्रेला’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : गेल्या ५० दशकापासून आधी प्रेम, नंतर अॅक्शन आणि शेवटी दोघांचा सुखेनैव संसार अशा धाटणीचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. दरम्यान निर्माते मनोज विशे यांनी नव्या धाटणीचा आणि नव्या रंगांनी सजलेली प्रेमाची 'अंब्रेला' हा चित्रपट ९ जून रोजी घेवून आले आहेत.

स्वत: मनोज विशे यांनी पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केलेल्या प्रेमाची 'अंब्रेला' चित्रपटाचा नावाइतकाच दिलखेचक ट्रेलर नुकताच लाँच झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून हाताळण्याची वेगळी शैली दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या ट्रेलरप्रमाणेच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलाय तो त्याच्या गाण्यांमुळे!. अजय गोगावले, सुनिधी चौहान, केके. आनंद शिंदे, नकाश अजीज, भारती माधवी अशा एकाहून एक सुरेल आणि मनात रुंजी घालणारे आवाज या गाण्यांना लाभले आहेत.

आपल्या दमदार अभिनयाचा ठसा मराठी सिनेरसिकांच्या मनावर उमटवत घराघरांत पोहोचलेले अभिनेते अरुण नलावडे या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्या प्रेमाची भन्नाट केमिस्ट्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीही त्यांच्या कारकिर्दीला साजेशा भूमिकेत दिसणार आहेत.

स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. नीलेश सतीश पाटील, सार्थक अधिकारी आणि आशिष ठाकरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी चित्रपटाचं संपादन केलं आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी भूषण चौधरी यांनी सामर्थपणे पेलली आहे. महेश गौतम, दलजीत सनोत्रा यांनी साऊंड इफेक्ट्सवर काम केलं आहे. राहुल आणि संजीव यांनी कोरिओग्राफी केली आहे. सुदेश देवान आणि तन्वीर मीर यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशाल पाटील चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT