म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : म्हाकवे येथील पोलीस पाटील अमित पाटील यांनी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील हलसिद्धनाथ यात्रेचा तांत्रिक देखावा गणेश भक्तांसाठी साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनेक गावचे लोक गर्दी करून लागले आहेत.
श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील यात्रा कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ही यात्रा ५ दिवस चालते. या यात्रेमध्ये हालसिद्धनाथांची भाकणूक हे मुख्य आकर्षण असते. या ५ दिवस चालणाऱ्या हालसिद्धनाथ यात्रेचा देखावा येथील पोलीस पाटील अमित पाटील यांनी साकारला आहे. यामध्ये घोडे पालखी सोहळा, वालंग ढोल बाजे वाजवणारे, कैत्याळ वाजवणारे, छत्री धरणारे, अब्दागिरी धरणारे याशिवाय यात्रेमध्ये असणारे खेळण्याची विविध दुकाने, पाळणे यांची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. श्री हालसिद्धनाथ यात्रेची प्रतिकृती पाहण्यासाठी अनेक गावचे लोक येत आहेत.
हेही वाचलंत का ?