सुनील आंबेकर 
Latest

नुपूर शर्मांबाबत ‘आरएसएस’चे मोठे विधान, ” उदयपूरमधील हत्‍या ही …”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भाजपच्‍या तत्‍कालिन राष्‍ट्रीय प्रवत्‍या नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावर शुक्रवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने ताशेरे ओढले. यानंतर राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने (आरएसएस) नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावर मोठे विधान करण्‍यात आले.

'द तालिबान : वॉर अँड रिलिजन इन अफगाणिस्‍तान' आणि 'द फॉरगॉटन हिस्‍ट्री ऑफ इंडिया' पुस्‍तकांच्‍या प्रकाशनप्रसंगी 'आरएसएस'चे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्‍हणाले की, " उदयपूरमध्‍ये झालेली हत्‍या ही कोणीतरी प्रक्षोभक विधान केले म्‍हणून झालेली नाही. उदयपूर घटनेमागे तालिबानी प्रवृत्ती आणि मानसिकता आहे. ही समजून घेण्‍याची गरज आहे."

कट्टरवादी विचारधारेला राजकीय स्‍वार्थासाठी समर्थन दिले जात आहे का?

ज्‍या देशाला धार्मिक कट्टरवादामुळे फाळणीला सामोरे जावे लागले आहे. फाळणी का झाली हे कधीच दुर्लक्षून चालणार नाही. भारतात आज काही दहशतवादी प्रवृत्तींना घुसखोरी केली आहे का? अलिकडे आपल्‍या देशात ज्‍या घटना होत आहे. याच्‍याशी त्‍याचा काही संबंध आहे का? कट्टरवादी विचारधारेला राजकीय स्‍वार्थासाठी समर्थन दिले जात आहे का? या सर्व प्रश्‍नांचा विचार होणे आवश्‍यक आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, आदिवासी नेता बिरसा मुंडा आणि अंदमान निकोबार कारागृहात आपलं जीवन करणारे मणिपूरचे राजा यांच्‍या योगदानाबदलद्‍ही माहिती होणे गरजेचे आहे. तेव्‍हाच समजेल की, ब्रिटीशांनी आपल्‍या देशाला कधीच एकसंघ करण्‍यासाठी प्रयत्‍न केले नाही, असेही आंबेकर म्‍हणाले.

दुसर्‍याची मदत आणि शांततेचा भंग करणार्‍यांना रोखण्‍यासाठी एका चांगल्‍या प्रवृत्तीच्‍या व्‍यक्‍तीने स्‍वत:ला मजबूत करण्‍याची गरज आहे. एखाद्‍याला काही प्रश्‍न असेल तर त्‍याने कायदेशीररीत्‍या हा प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे आवाहनही त्‍यांनी केले.देशाची फाळणी का झाली, धर्मनिरपेक्षता या शब्‍दाचा भारतीय राज्‍यघटनेत कसा समावेश झाला, याची माहिती नवीन पिढीला होणे गरजेचे आहे. आपल्‍या देशावर पुन्‍हा हल्‍ला होवू यासाठी सर्वांनीच जागृत राहण्‍याची गरज आहे. असेही आंबेकर म्‍हणाले.

 हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT