पुढारी ऑनलाईन :
दाऊद इब्राहिमचा भाचा आणि हासिना पारकरचा मुलगा अलिशहा पारकर याने ईडीसमोर मोठा खुलासा केला आहे. आपला मामा कुख्यात डॉन दाऊद हा पाकिस्तानातील कराचीत असल्याची माहिती त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीदरम्यान त्याने हा खुलासा केला असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
दाऊदचा भाचा अलिशहा पारकर याने ईडीला सांगितले की, "दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा त्याच्याशी संपर्क नाही. दाऊदची पत्नी महजबीनने सणांच्या काळात माझी बायको आणि बहिणीशी संपर्क केला होता, असेही त्याने चाैकशी दरम्यान सांगितले.