Latest

भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला, जालन्यातील घटनेचे लासलगावला पडसाद

गणेश सोनवणे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जालना येथील मराठा समाजावर झालेल्या हल्याच्या निषेध लासलगाव येथे करण्यात आला. १९७२ पेक्षा ही यंदा दुष्काळ जन्य परिस्थिती असतांना लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला आहे. निषेध व्यक्त करून चालणार नाही तर निर्णय घेण्याची वेळ आहे. भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी केली.

या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला- लासलगाव मतदार संघातील 46 गावे बंद पाळण्याचे ठरवण्यात आले. कालच्या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र येत या घटनेचा निषेध केला पाहिजे अशी मागणी सरपंच जयदत्त होळकर यांनी केली.

मराठा आरक्षणाचा उगम हा येवला-लासलगाव मतदारसंघात असून १६८ आमदार मराठा समाजाचे आमदार असून देखील आरक्षण मिळत नाही हे त्यांचे अपयश आहे. आता आमदारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. जालना येथे जिल्हा पोलीस अधीक्षक जोशी असून गृहमंत्री हे फडणवीस आहे. असा हा निव्वळ योगायोग असू शकत नाही हे षड्यंत्र असल्याची टीका शिवा सुरासे यांनी केली. येवला -लासलगाव मतदार संघांचे आमदार छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या मागे उभे राहणार नसेल तर त्यांनी दुसऱ्या मतदार संघाचा विचार करावा असा थेट इशारा रामनाथ शेजवळ यांनी दिला.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, सरपंच जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, उत्तम कदम, माजी पंचायत समिती अध्यक्ष शिवा सुरासे, प्रकाश पाटील, सचिन होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, प्रवीण कदम, ललित दरेकर, रवी होळकर, रमेश पालवे, डॉ विकास चांदर, डॉ.  सुजित गुंजाळ, डॉ. विलास कांगणे, संतोष पानगव्हाणे, अफजल शेख, विशाल पालवे, मंगेश गवळी, डॉ. अमोल शेजवळ, राम बोराडे, राजाबाबा होळकर, योगेश पाटील, केशव जाधव, महेश होळकर, ज्ञानेश्वर इंगळे, लतीब तांबोळी, बिस्मिला शेख, संतोष ब्रम्हेचा, संजय ट्रले, मंगेश गवळी, अफजल शेख, महेश पाटील, लतीफ शेख, प्रा. किशोर गोसावी, युनुस तांबोळी, रमेश खोडके, ज्ञानेश्वर पाटील, राहुल शेजवळ, संदीप गायकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT