Latest

लोकोत्सवातील अध्यात्म, शास्त्र आणि नैसर्गिक तत्वांची सांगड फायद्याची ठरेल : एकनाथ शिंदे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अध्यात्म, शास्त्र आणि नैसर्गिक तत्व यांची सांगड घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा लोकोत्सव फायद्याचा ठरेल. या लोकोत्सवातून पर्यावरणासाठी लोकचळवळ उभारेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कणेरी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचे आज (दि.२०) उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदा होईल याची संकल्पना या लोकोत्सवाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदुषण कमी करायच असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांच पालन करायला लागेल. राज्याच्या पर्यावरणपूरक विकासावर कटाक्ष देत आहे. राज्यशासनही पर्यावराचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करत आहे. सरकारने पहिल्या कॅबिनेटपासून लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे. रासायनिक खतांना जशी सबसिडी दिली जाते तशी सेंद्रीय शेती आणि खतांकरीता देण्यासाठी प्रतत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कणेरी मठ हे एक ज्ञानाचे भांडार आहे. निसर्गासोबत राहणे ही आपली मानवता आहे. पण विकासाच्या नावाखाली आपण ती विसरलो आहे. आपण विकासाच्या दिशेने नाही तर विनाशाकडे जात आहे. आपल्याला आपली जीवन शैली बदलावी लागेल. भारतीय संस्कृतीने नदीला माता तर पर्यावरणाला ईश्वर मानले आहे. आपल्याला या सभ्यतेला वाचवायचं असेल तर शाश्वत विकासाची अंमलबंजावणी केली पाहिजे. हे काम या लोकोत्सवाच्या माध्यमातून होत आहे.

जलवायू परिवर्तन या वास्तविकतेसोबत लढायच असेल तर आपल्याला शाश्वत विकासवरच भर देणे गरजेचे आहे. भारत कॅन्सरचे केंद्रस्थान होत आहे, याला थांबवायला पाहिजे. यासाठी फक्त सरकरची मोहिम नाही तर असे लोकोत्सव तयार करायला पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती करण्याचे मिशन तयार केले आहे. राज्यात ८ हजार मेगावॅट वीज शेतकऱ्यांना लागते. येत्या दोन वर्षात त्यातील ४ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून दिली जाईल. ज्यामुळे दिवसभर शेतकऱ्यांना वीज मिळेल तसेच प्रदुषणही कमी होईल. शेतीतील वेगवेगळे प्रयोग कणेरी मठावर केले जात आहेत. हा मठ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आपल्या अनेक संस्कृतींना लोकांपर्यंत पोहचवलं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT