भाजपच्या दोन लिंगायत नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपा
भाजपा

बंगळूर; वृत्तसंस्था :  विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या लिंगायत समाजाच्या दोन भाजप नेत्यांनी आपल्या 100 समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही टी. एस. रवी आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

टी. एस. रवी यांचे समर्थक मानले जाणारे एच. डी. थम्मया आणि येडियुराप्पा यांचे समर्थक के. एस. किरणकुमार यांनी रविवारी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोघांनाही येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, असे भाजपने कळवल्यामुळे नाराज झालेल्या या नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही लिंगायत समाजाचे असल्याने भाजपला हा हादरा मानला जात
आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news