H3N2 
Latest

H3N2 : दिल्लीत नव्या विषाणूचा संसर्ग वाढला, देशभर फैलाव, अशी घ्या काळजी

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्ली सध्या नव्या विषाणूच्या विळख्यात अडकत चालली असून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणू मुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केवळ दिल्लीच नाही तर पंजाबसह अनेक राज्यांमध्ये ही प्रकरणे वाढताना दिसत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांनी सांगितले की, भारतात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सततचा खोकला आणि काही प्रकरणांमध्ये तापासह खोकला हे 'इन्फ्लुएंझा ए' चा 'H3N2' हा प्रकार वाढताना दिसत आहे. या विषाणूमुळे ताप, खोकला, आणि फुफ्फुसातील संसर्गाने घरोघरी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. या आजारात मृत्यूच्या शक्यतेचे प्रमाण अत्यल्प असले, तरी हा विषाणू सध्या संशोधकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. (H3N2)

ICMR च्या तज्ज्ञानुसार, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रूग्णांच्या हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण वाढले असून याचे मुख्य कारण 'H3N2' असल्याचे आढळून आले आहे. संस्थेच्या 'व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज नेटवर्क' ही उपसंस्था श्वसनाद्वारे पसरणाऱ्या या विषाणूंवर आणि त्यासंबंधीत आजारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. लोकांना विषाणूपासून वाचवण्यासाठी काय करावे आणि करू नये याची यादीही त्यांनी जाहीर केली आहे. (H3N2)

दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशभरात खोकला, सर्दी आणि मळमळण्याच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्सच्या अतिवापराविरूद्ध सावधगिरी बलागण्याचा सल्ला दिल आहे. या विषाणूमुळे येणारा ताप पाच ते सात दिवस राहणार असल्याचे आयएमएने म्हटले आहे. तसेच, IMA च्या स्थायी समितीने सांगितले की, ताप तीन दिवसांत निघून जाईल, पण खोकला तीन आठवडे टिकू शकतो. (H3N2)

H3N2 :  काय आहेत याची लक्षणे

आयसीएमआर (Indian Council of Medical Research-ICMR) ने या फ्लू पासून बचाव करण्यासाठी एक मार्गदर्शिका सांगितली आहे. यामध्ये त्यांनी आपण काय करायचं आणि काय करायचं आहे हे सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये H3N2 व्हायरसने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ९२% रुग्णांना ताप होता. ८६% रुग्णांना खोकला होता, २७% रुग्णांना धाप लागणे, १६ % रुग्णांना आवाज बसणे अशा समस्या जाणवतं होत्या. आयसीएमआरने आपल्या रिपोर्टमध्ये हे सांगितले आहे की, १६% रुग्णांना न्युमोनिया होता, ६% रुग्णांना फीट येणे, त्याचबरोबर  छातीमध्ये कफ, अंगदुखी हीही लक्षणे जाणवतात.

काय करू नये

आयसीएमआर (ICMR) ने म्हटले आहे की, ताप ३ दिवसात जातो.  खोकला साधारण: 3 आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.

  • प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) अतिवापरापासून टाळा.
  • आपल्या आजारावर स्वत:च औषधोपचार करु नका.
  • कोणत्याही स्वरुपाचा त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.
  • आयसीएमआरने(ICMR) असेही म्हटले आहे की अँटीबायोटिक्स आणि इतर औषधे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावीत.

संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल

संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आयसीएमआर (ICMR) ने काही नियमावली सांगितली आहे.त्या पुढीलप्रमाणे.

  • नियमितपणे पाणी आणि साबणाने हात धुवा मास्कचा वापर करा.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
  • खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका.
  • हायड्रेटेड रहा आणि भरपूर जलपदार्थांचे सेवन करा.
  • ताप आणि डोकेदुखी असेल तर पॅरासिटामॉल वापरा.
    सकस आहार.

हे वचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT