पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या दिवशी म्हणजे ३ जून २००० ला मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जेडजा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील शेवटचा सामना खेळला होता. ढाका येथे पाकिस्तानच्या विरूद्ध झालेला सामना अजहरूद्दीन आणि जडेजा यांच्या आंतरराष्ट्रीय करियरमधील अंतिम सामना ठरला. यानंतर हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत. २००० साली आशिया कपमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या करियरमधील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. (Cricket Career)
३ जूनला अजय जडेजाने खेळलेल्या शेवटच्या सामन्यात ९३ धावा केल्या होत्या, तर अजहरूद्दी १ धाव करत बाद झाला होता. जडेजाला इमरान नजीर यांने तर अजहरूद्दीनला अब्दुल रज्जाक यांने बाद केले होते. अजय जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त धावा काढल्या नाहीत, पण नव्वदच्या दशकात तो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. जडेजाने आपल्या करियरमध्ये १५ टेस्ट सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ४ शतक ठोकत ५७६ धावा केल्या होत्या. तर १९६ एकदिवसीय सामने खेळले ज्यामध्ये त्याने ५३५९ धावा केल्या. जडेजाची उत्कृष्ट फिल्डर म्हणूनही ओळख होती. (Cricket Career)
मोहम्मद अजहरूद्दीनने आपल्या करियरमध्ये ९९ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ६३१५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अजहरूद्दीनच्या नावावर २२ शतक तर २१ अर्धशतक आहेत. अजहरूद्दीनने ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ९३७८ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये अजहरच्या नावावर ७ शतक तर ५८ अर्धशतक आहेत. मोहम्मद अजहरूद्दीनने १९८५ मध्ये इंग्लंडविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. (Cricket Career)