ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कसारा लोकल नेहमी उशिरा धावत असल्याने उपनगरीय महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी आज (मंगळवार) वाशिंद रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. कसारा लोकल नेहमी 12 ते 15 मिनिटे उशिरा धावते. या मार्गावर मेल एक्स्प्रेसला सकाळीदेखील लोकल मार्गावर काढण्यात येते. यामुळे कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
या वसिंद रेल्वे स्टेशन पाहणी दौऱ्याप्रसंगी उपनगरीय महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, सेन्ट्रल रेल्वेचे एसीसी कमिटी सदस्य अमोल कदम उपस्थित होते. रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार, मालगाडीचे इंजिन फेल होणे, लोकल गाड्या उशिरा धावणे या संदर्भात आज उपनगरीय महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, सेन्ट्रल रेल्वेचे एससीसी कमिटी सदस्य अमोल कदम यांनी वासींद रेल्वे स्टेशनची पाहणी केली, तसेच स्टेशन मास्तर यांची भेट घेतली. या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार असून, वेळीच सुधारणा करण्यास सांगण्यात येणार आहे.
हेही वाचा :