tejaswi prakash  
Latest

तेजस्वी प्रकाश : ‘लग्नानंतर वडील आईला सोडून गेले, लोक टोमणे मारायचे’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी प्रकाशने मोठा प्रवास केला आहे. तिचं पूर्ण लक्ष आता बिग बॉसच्या ट्रॉफीकडे आहे. त्याचबरोबर, ती घरात करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेतेदखील आहे. तेजस्वी प्रकाशने आपल्या साथीदारांसोबत बोलताना फॅमिली स्ट्रगल्सविषयी सांगितले. तिने सांगितलं की, जेव्हा तिचे वडील न सांगता निघून गेले होते. तिच्या आईपासून दीड वर्षे दूर होते. लग्नाच्या एक आठवड्यानंतरचं ते आईला सोडून निघून गेले होते.

वडिलांनी आईला धोका दिला होता?

ती म्हणाली-जेव्हा माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं. तेव्हा आठवडाभरानंतर माझे वडील दुबईला निघून गेले होते. त्यांचं अरेंज्ड मॅरेज होतं. ते दीड वर्ष परत आले नाहीत. सर्व जण आईला म्हणायचे की ते धोका देऊन पळून गला. आता तो येणार नाही. लग्न करूऩ पळऊन गेलाय तो. पण, वडील आणि आई एकमेकांना प्रेमपत्र लिहायचे. ते फोनवरून बोलण्यासाठी फोन बूथवर जाण्याचे प्लॅनिंग करायचे. किती कठीण होतं यार.

दीड वर्षे तिच्या वडिलांनी काय केलं? यावर ती पुढे म्हणाली की, त्यांनी दुबईत सेटल होण्यासाठी इतके वर्षे घालवले. मोठं घर खरेदी केलं. महागडी कार खरेदी केली. अन्य साहित्य खरेदी केलं. त्यानंतर आईला दुबईला बोलावलं. आधी लोक नाराज होते. तर सर्वजण खूश झाले. तिने पुढे सांगितले की काही काळासाठी तिला दुबईत राहावं लागलं होतं. ती UAE चीही रेसिडेंट असायची.

करण कुंद्रासोबत रिलेशनशीपमध्ये

बिग बॉसच्या घरात प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. तिला अनेकदा सलमान खानकडून फटकारदेखील मिळाला आहे. पण, कुंद्रा आणि त्यांच्या मध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. तिने बिग बॉसच्या आधी स्वर्गिनी-जोडे रिश्तों के सुर, पहरेदार पिया या मालिकांमध्ये काम केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT