पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये माझ्या बॅगेतून पैसे, कार्ड्स आणि दागिन्यांची चोरी झाल्याचा दावा भारतीय महिला क्रिकेटर तानिया भाटियाने केला आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेदरम्यान हा प्रकार घडला असल्याचा खुलासा तिने केला आहे. या मालिकेत दीप्ती शर्माने चार्ली डीन हिला धावबाद केल्यानंतर बराच वाद झाला. (Taniya Bhatiya Claims)
मॅरियट हॉटेलने केलेल्या व्यवस्थापनाबद्दल मी निराश आहे. मी भारतीय संघाचा भाग म्हणून या हॉटेलमध्ये वास्तव केले होते. या वेळी माझ्या रूममधून रोख रक्कम, कार्ड, घड्याळे आणि दागिने असलेली माझी बॅग चोरली गेली, असा दावा तानिया भाटियाने केला आहे. यामुळे मला काही काळ असुरक्षित असल्याचेही वाटत होते. या प्रकरणाची लवकर चौकशी होईल, अशी अपेक्षाही तिने यावेळी व्यक्त केली आहे. (Taniya Bhatiya Claims)