पुढारी ऑनलाईन : चेन्नईतील एनएससी बोस रोडवरील जुनी इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर यामध्ये ३ जण जखमी झाल्याची घटना घडली. शुक्रवारी (दि.०४) रात्री ही दुर्घटना घडली. ही इमारत १०० वर्षापूर्वीची असल्याने याचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जवानांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढत, त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे.