Latest

पाकिस्तानने सडलेला गहू दिल्याने तालिबानचा तीळपापड; भारताचे केले कौतुक !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने सडलेले धान्य दिल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली आहे. त्याचबरोबर भारताने पाठवलेल्या चांगल्या प्रतीच्या गव्हाचे कौतुक केले आहे. अशी तालिबानने व्टिटरवरून माहीती दिली. त्यांच्या या माहितीमुळे ट्विटरवर याची चर्चा सुरू झाली.

अफगाणिस्तानने भारतीय गव्हाच्या गुणवत्तेबद्दल केलेल्या कौतुकाचा संदर्भ देत, भारताने सांगितले की युद्धग्रस्त देशाला मानवतावादी मदत म्हणून 4,000 टन गहू पाकिस्तानच्या सीमेवरून पाठवला आहे. 2,000 टन अन्नधान्याची तिसरी खेप 8 मार्च रोजी पाठवली जाईल. भारताने 125 कोटी रुपये किमतीचा एकूण 50,000 टन दर्जेदार गहू पाकिस्तानच्या भूमार्गाने अफगाणिस्तानला पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. हे धान्य अफगाणिस्तानातील लोकांमध्ये वितरणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला दिले जाईल.

अन्न व पुरवठामंत्री पियुष गोयल यांनी यासंबधित ट्विट करुन माहिती दिली की, मानवता ही सर्वांप्रती सारखी आहे, आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळे भारत अफगाणिस्तानातील लोकांना मानवता म्हणून चांगल्या प्रतीचा गहू पुरवू शकला आहे.

केंद्रिय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी डिजिटल पत्रकार परिषदेत सांगितले की, अफगाणिस्तानला भारताकडून "खूप चांगली" मदत दिली आहे. 22 फेब्रुवारीला गव्हाची पहिली खेप पाठवण्यात आली. मार्चअखेर 10,000 टन अन्नधान्य पाठवले जाईल. उर्वरित 40,000 धान्य 2000-2000 टन असे टप्याटप्याने पाठवले जाईल, असे ते म्हणाले. संपूर्ण 50000 टन गहू एक महिन्यात किंवा त्याहून अधिक कालावधीत वितरित केला जाईल. 2022 च्या 8, 14 आणि 20 मार्च रोजी 2,000-2,000 टन गहू पाकिस्तान सीमेवरून पाठवला जाईल.

पाकिस्तानने अफगाणिस्तानात पाठवला सडलेला गहू

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अनेकवेळा पाकिस्तानची तालिबानी नेत्यांशी असलेली जवळीकता समोर आली. त्याचबरोबर मानवी भावनेची जाणीव ठेवून अनेक देश अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करत आहेत. भारत आणि पाकिस्ताननेही अफगाणिस्तानला गहू दिला. यावर सोशल मीडियामध्ये असे सांगितले जाऊ लागले की पाकिस्तानने पाठवलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. आणि भारतातून पाठवलेल्या गव्हाचेही कौतुक आले.

अफगाण पत्रकार अब्दुल्ला ओमेरी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये तालिबानी अधिकारी सांगत आहेत की पाकिस्तानचा गहू खाण्यायोग्य नाही. त्याचवेळी अफगाणिस्तानातील लोक चांगल्या गव्हासाठी भारताचे आभार मानत होते. हमदुल्ला अरबाब यांनी ट्विटरवर पोस्ट करून सांगितले की, 'अफगाणिस्तानातील लोकांना नेहमी मदत केल्याबद्दल भारताचे आभार. आमचे नाते कायम राहील. भारत चिरायु हो'

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT