Latest

Taliban Ban Condoms : अफगाणिस्तानात तालिबानने घातली कंडोम, गर्भनिरोधक औषधांवर बंदी

अमृता चौगुले

काबुल; पुढारी ऑनलाईन : तालिबानने आणखी एक अजब फतवा लागू केला आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या दोन प्रमुख शहरांमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामागचे कारण स्पष्ट करताना तालिबानने दावा केला की, याद्वारे मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानी सैन्य वैयक्तिकरित्या घरोघरी जाऊन लोकांना कंडोम न वापरण्याचे आवाहन करत आहेत. (Taliban Ban Condoms)

काबुलमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाने सांगितले की, तालिबानचे बंदूकधारी त्याच्या दुकानात आले आणि त्यांनी त्याच्या दुकानात गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम न ठेवण्याची धमकी दिली. स्टोअर मालक म्हणाले की ते तपासण्यासाठी नियमित गस्त घालत आहेत. अशा परिस्थितीत तालिबानच्या भीतीने दुकानदारांनी कंडोम आणि गर्भपाताच्या गोळ्या ठेवणे बंद केले आहे. एका महिलेने सांगितले की तालिबान कमांडरने तिला सांगितले की तिला पाश्चात्य कटांना प्रोत्साहन देण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची गरज नाही आणि हे एक घृणास्पद कृत्य आहे. (Taliban Ban Condoms)

तालिबानचे जाचक हुकुमात वाढ (Taliban Ban Condoms)

काबूलमधील दुसर्‍या मेडिकल स्टोअरच्या मालकाने स्पष्ट केले की, या महिन्याच्या सुरुवातीपासून, तालिबानी लढवय्ये त्याच्या दुकानात येऊन कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, दाप्रो-प्रोवेरा इंजेक्शन यासारख्या वस्तू न विकण्याची धमकी देत आहेत. महिलांचे हक्क दडपण्यासाठी तालिबानचा हा नवा हुकूम आहे. ऑगस्ट २०२१1 मध्ये सत्तेवर परतलेल्या तालिबानने मुलींचे शिक्षण नाकारले, त्यांना विद्यापीठात जाण्यापासून रोखले, त्यांना नोकरीतून काढून टाकले आणि मेहरामशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घातली.

गंभीर आरोग्य संकट निर्माण होण्याचा धोका

गर्भनिरोधकांवर बंदी घालणे हे अफगाणिस्तानसाठी एक महत्त्वपूर्ण धक्का म्हणून पाहिले जात आहे, अफगणिस्तानची आरोग्य व्यवस्था आधीच नाजूक आहे. यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा दावा केला जात आहे. गरोदरपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने दर 14 पैकी 1 महिलेचा मृत्यू होतो. याशिवाय तालिबानींच्या या आदेशामुळे देशात लोकसंख्येचा स्फोट होण्याचा धोकाही निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे. काबूलमधील तालिबानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने या विषयावर कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध केले नाही.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT