पुण्यातील तरुणानं तयार केलं नाण्याचं शिवलिंग; 22 हजार 301 नाण्यांचा वापर | पुढारी

पुण्यातील तरुणानं तयार केलं नाण्याचं शिवलिंग; 22 हजार 301 नाण्यांचा वापर

पुढारी ऑनलाईन: अनेक तरुण अनेक दररोज नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात अनेकांनी विक्रमदेखील केले आहेत. शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं निमित्त साधून पुण्यातील एका तरुणाने चक्क नाण्यांपासून शिवलिंग तयार केले आहे. या साठी 22 हजार 301 नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. 79 हजार 307 रुपये किंमतीची नाणी वापरण्यात आहेत. या शिवलिंगाची मागच्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे.

पुण्यातील हडपसर परिसरातील काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. 22 हजार 301 नाण्यांचा त्यासाठी वापर केला आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे. दीपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनेमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं करावे, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग साकारले. गेल्या वर्षभरापासून परिसरात या शिवलिंगाची चर्चा सुरू आहे.

दीपक घोलप या तरुणाने तयार केलेले आकर्षक शिवलिंग पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करताना दिसत आहे. अनेकांकडून त्याचे कौतुक देखील केलं जात आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करून त्याने हे शिवलिंग तयार केले आहे. त्याच्या याच शिवलिंगाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून घेण्यात आली आहे.

Back to top button