Taapsee Pannu 
Latest

Taapsee Pannu : तापसीच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चं शूटिंग पूर्ण

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर येलो प्रॉडक्शनचा 'तनु वेड्स मनू', 'रांझना', 'गुड लक जेरी' आणि 'तुंबाड' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटानंतर आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपट येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ( Taapsee Pannu ) याच्यासोबत अनेक कलाकारांनी भूमिका सारली आहे. नुकतेच 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याबाबतची एक खास पोस्ट सोशल मीडिया सेअर निर्मात्यांनी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या 

निर्माते आनंद एल. राय यांच्या घरी चित्रपटाचे शुंटिग पूर्ण झाल्यावर सेलिब्रेशन दणक्यात करण्यात आलं. चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबरसोबत त्यांचे जवळचे काही मित्र मंडळी उपस्थित होते. 'हसीन दिलरुबा' हा ओटीटी ( OTT ) मनोरंजनाच्या क्षेत्रात एक उत्कृष्ठ ठरला आणि सर्वाधिक पाहिलेला चित्रपट म्हणून आणि सलग अनेक आठवडे आपला दबदबा कायम ठेवत त्याने आपले स्थान निर्माण केले.

आनंद एल. राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने ओटीटीवर आपल्या कामाची जादू कायम दाखवली. २०२४ मध्ये Netflix वर 'फिर आयी हसीन दिलरुबा' च्या OTT रिलीजच्या घोषणा झाली. 'फिर आयी हसीन दिलरुबा'सोबत कलर यलो प्रॉडक्शन्स 'तेरे इश्क में' आणि 'नखरेवाली' असे अनेक रोमांचक चित्रपट साकारत आहेत. ( Taapsee Pannu )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT