Latest

T20 World Cup : इंग्लंडच्या पंचांनी तोडला बायो बबलचा प्रोटोकॉल

backup backup

युएई आणि ओमानमध्ये सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये ( T20 World Cup ) कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठी काळजी घेतली जात आहे. दरम्यान, इंग्लंडचे पंच मायकेल गॉफ यांना सहा दिवस सक्तीच्या आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले आल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती आयीसीसीने दिली आहे. मायकेल गॉफ यांनी टी २० वर्ल्डकपसाठीच्या बायो बबलचा प्रोटोकॉल मोडला म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपसाठी ( T20 World Cup ) खेळाडू, पंच, सहाय्यक स्टाफ आणि प्रसारण करणारे कर्मचारी यांच्यासाठी कडक बायो बबलचे नियम आहेत. मात्र या बायो बबलचा भंग इंग्लंडचे पंच मायकेल गॉफ यांनी केला. त्यानंतर आयसीसीच्या प्रवक्त्यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात 'बायो सिक्युरिटी सल्लागार समितीने पंच मायकेल गॉफ यांना बायो सिक्युरिटी प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणी सहा दिवसांचे आयसोलेशनमध्ये जाण्यास सांगितले.'

T20 World Cup : मायकेल गॉफ आहेत एलिट पंच

४१ वर्षाचे मायकेल गॉफ हे आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये आहेत. ते सुपर १२ मधील वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या सामन्यात टीव्ही पंच म्हणून काम पहात होते. ते डरहॅमकडून फलंदाजी देखील करायचे. त्यांची रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात ऑन फिल्ड पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ आता आपल्या शेवटाकडे कूच करत आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुबईत आयसीसी टी २० वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT