T20 World Cup 
Latest

T20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ जाहीर! ‘या’ अष्टपैलू खेळाडूला़ डच्चू

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात बांगलादेश अनुभवी अष्टपैलू महमुदुल्ला याला स्थान देण्यात आलेले नाही. त्याला विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले आहे. महमुदुल्लाचा समावेश त्या 6 खेळाडूंमध्ये आहे ज्यांना टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. नुकत्याच झालेल्या आशिया चषक २०२२ मध्ये हे खेळाडू संघाचा भाग होते. (T20 World Cup)

महमुदुल्लाह आणि मुशफिकुर रहीम यांनी नुकतीच टी 20 प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. शिवाय, अनामुल हक, मोहम्मद नईम, परवेझ हुसैन आणि महेदी हसन यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. त्याऐवजी नजमुल हुसेन, लिटन दास, यासिर अली, नूरुल हसन आणि हसन यांचा विश्वचषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. शोरफुल इस्लाम, रिशाद हुसेन, महेदी हसन आणि सौम्या सरकार यांना संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. (T20 World Cup)

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ खालीलप्रमाणे;

बांग्लादेश संघ : शकीब अल हसन, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, लिटन दास, यासिर अली, नुरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, सैफुद्दीन, तस्किन अहमद, इबादत हुसेन, हसन महमूद, हसन मोहम्मद, नसूम अहमद.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT