Latest

स्वरा भास्करपासून रिचा चढ्ढापर्यंत, बॉलीवूडच्या ‘या’ दबंग अभिनेत्री, ज्यांना सोशल मीडियावर घाबरतात ट्रोलर्स

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन बॉलीवूड अभिनेत्रींचे सौंदर्य आणि त्‍यांच्या अभिनयाचे जगभर चाहते आहेत. सोशल मीडियावर या सर्व बॉलिवूड अभिनेत्रींचे करोडो चाहते आहेत. जे त्‍यांच्या प्रत्‍येक पोस्‍टला पसंद करतात. त्‍यांना प्रोत्‍साहनही देतात. त्‍यातच बॉलिवूड मध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्‍यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. मात्र या अभिनेत्री शांतपणे या ट्रोलिंग सहन न करता त्‍या ट्रोलर्संना जशास तसे उत्‍तर देतात. काही बॉलिवूड तारका या सोशल मीडियावर आपल्‍या हजरजबाबी स्‍वभावामुळे अधिक ओळखल्‍या जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींना भेटवणार आहोत, ज्‍यांच्याशी पंगा घेण्याआधी ट्रोलर्सही शंभरवेळा विचार करतात.

या लिस्‍ट मध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्‍वरा भास्‍करचे नाव सर्वात वर आहे. स्‍वरा भास्‍कर ही अशी अभिनेत्री आहे, जी अभिनयापेक्षा आपल्‍या ट्विट्समुळेच अधिक चर्चेत असते. स्‍वराला तीच्या प्रत्‍येक पोस्‍टसाठी नेहमीच ट्रोल व्हावे लागते. मात्र आपल्‍या उत्‍तराने स्‍वरा ट्रोलर्सची बोलती बंद करते.

सर्वाधिक वादात राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये रिचा चढ्ढाचं नावही सामील आहे. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मोकळेपणाने मांडणारी ऋचा अनेकदा ट्रोल झाली. तरी तिने तिच्या सडेतोड उत्तराने ट्रोलर्सना नक्कीच शांत केले.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कंगना अनेकदा सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय आणि बॉलिवूडसंबंधी विषयावर बिनधास्‍तपणे विचार मांडत असते. आपले मत व्यक्‍त करत असते. बऱ्याचवेळा ती असे वक्तव्य करते, त्यामुळे लोक तिला ट्रोल करायला लागतात. पण ट्रोलिंगचा कंगणावर अजिबात परिणाम होत नाही. तिच्या उत्तराने ती ट्रोलर्सच्या तोंडचे पाणी पळवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT