Latest

बीबीसी कार्यालयात सलग तिसऱ्या दिवशी सर्वेक्षण; 10 कर्मचारी दोन रात्री कार्यालयातच

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: दिल्लीतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. वित्त आणि संपादकीय विभागांसह सुमारे 10 वरिष्ठ बीबीसी कर्मचाऱ्यांना दोन रात्री कार्यलयातच काढाव्या लागल्या आहेत. बीबीसीच्या या कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अन्य काही कर्मचाऱ्यांचे फोन देखील क्लोन करण्यात आले आहेत.

बीबीसीने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे संगणक तपासले गेले आहेत त्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. हिंदू सेनेच्या गुरुवारी झालेल्या प्रदर्शनानंतर आज बीबीसी कार्यालयाबाहेर ITBP तैनात करण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभाग (IT) 2012 पासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्ली आणि मुंबई कार्यालयात खात्यांची तपासणी करत आहे. आयकरची आयटी टीम बीबीसीच्या ब्रॉडकास्ट ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे बीबीसीने कर्मचाऱ्यांना आयकर विभागाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सूडापोटी आयकरची कारावाई: काँग्रेसचा आरोप

आंतरराष्ट्रीय करांमध्ये गडबड असल्याच्या संशयावरून बीबीसीच्या कागदपत्रांची आयकर विभागाकडून छाननी सुरु आहे. गेल्या 14 तारखेला आयकर खात्याचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात जाऊन धडकले होते. तपासात आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत, असे बीबीसीकडून त्याच दिवशी सांगण्यात आले होते. बीबीसीच्या कार्यालयात सुरु असलेल्या कारवाईवर काॅंग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुजरात दंगलीच्या अनुषंगाने लघुपट बनविल्यामुळे सूडापोटी बीबीसीला प्रताडित केले जात असल्याचे काॅंग्रेसकडून सांगण्यात आले होते. एकप्रकारची ही अघोषित आणीबाणी असल्याचेही काॅंग्रेसने म्हटले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT