Supriya Sule & Sharad Pawar 
Latest

शिवाजी पार्कवर खासदार लेकीचा साधेपणा ! पवार बापलेकीच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा !

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या काल सकाळी (६ फेब्रुवारी) वयाच्या ९२ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या आणि संगितविश्वातील एक युग संपलं. पण त्या त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून नेहमीचं आपल्यात असतील.
लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मुंबईच्या शिवाजी पार्क शिवतीर्थावर सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, विज्ञान अशा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी आलेले. दिवसभर माणसांची रिघ होती. माध्यमे सर्व अपडेट देत होते पण दिवसभरातील दोन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा. (Supriya Sule & Sharad Pawar)

नेमकं काय झालं ? 

शरद पवार यांनी आपल्या पायातील शूज काढून लतादीदींच्या (Lata Mangeshkar) पार्थिवाचे दर्शन घेवून श्रध्दांजली वाहिली आणि आपल्या खुर्चीवर येवून बसले. बूट खाली वाकून घालू लागले पण वयोमानाने त्यांना बूट घालता येईना; हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आलं आणि विलंब नकरता त्यांनी तत्काळ शरद पवार यांच्या पायात स्वत: शूज घातले. खरतरं ही बाब खूप सर्वसामान्य आहे.
लेकीनं बापाच्या पायात शूज घालणे ही साधी गोष्ट असली तरी प्रसंगावधान आणि भावनिक प्रसंगाने सर्वांना ती गोष्ट भावली आहे. कोणत्याही बापलेकीचं नातं हे जिव्हाळ्याचं असतं. शब्दात न व्यक्त होणारं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा भावनिक बंध सांगणारा बाप आणि लेकीच्या नात्याचा नेमका हा प्रसंग फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Lata Mangeshkar लतादीदीही आपल्या बाबांच्या लाडक्या

आपल्या जादूई आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य  करणार्‍या लताही आपल्या बाबांच्या (पं. दीनानाथ) लाडक्या होत्या. पं दीनानाथ एका नाटकातील लतिका पात्राला प्रभावित होवून ते हेमाला लता म्हणू लागले. वडील पं दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. लतादीदींना गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले. लताकडून ते तासनतास गायनाचा रियाज करून घेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT