ते नुसते दादाचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच कै. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही. पवार कुटुंबियाला संघर्ष नवीन नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकरचे छापे पडले. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ठाण्यात ही प्रक्रिया दिली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे कार्यालयाच्या शेजारी तुळजा भवानी मंदिर आहे. येथे महाआरतीसाठी खासदार सुळे आल्या होत्या. ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. ते केवळ दादाचे नातेवाईक नसून आमचेही नातेवाईक असल्याचे सांगितले. आमचे सर्वांचे एकत्र कुटुंब असल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीकडून अशा प्रकारे सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
मंदिरे उघडल्याने आघाडी सरकारचे त्यांनी आभार मानले. नियम पाळूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. वर्षातून नऊ दिवस शांताबाई पवार आणि माझी आई उपास पकडायच्या. तिच प्रथा माझ्या आईने सुरु ठेवली. त्यामुळे नवरात्रोत्सव माझी आईच असल्याचे सुळे यांनी सांगितले.
त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात यांची नाव घेऊन त्यांचेही आभार मानले.