सर्वोच्च न्यायालय 
Latest

मोकाट श्वानांबाबत हायकोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मोकाट-भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन घरी घेऊन जा आणि नंतरच खाऊ घाला, या न्यायालयाने घातलेल्या अटीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे मनपाच्या या संदर्भातील दंडात्मक तरतुदीलाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नागपूर महानगर पालिकेच्यावतीने २०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली होती.

पशुप्रेमींनी याविरोधात दंड थोपटल्याने हा विषय एरणी आला होता. अखेर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

नागपुरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेला शहरात कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी विविध भागात जागा निश्चित करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र, नागपूर महानगरपालिकेडून शहरात जागा निश्चित न करण्यात येता तक्रार आल्यावर कुत्र्यांना पकडण्याची कारवाई सुरुच होती. मनपाद्वारे जागा निश्चित होईपर्यंत, रस्त्यावरील कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाला कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजीव खन्ना आणि न्या. जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. या कालावधीत उच्च न्यायालयात या मुद्यावर सुरु असलेली सुनावणी नियमित सुरु राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT