नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरुन न्यायपालिकेबद्दल टीका टिप्पणी केल्याप्रकरणी विनाअट माफी मागा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आयपीएलचे माजी प्रमुख आणि उद्योगपती ललित मोदी यांना दिले आहेत. सोशल मीडीयाबरोबरच प्रमुख दैनिकांच्या माध्यमातून माफी मागावी, असे निर्देश न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने दिले.
ललित मोदी हे कायदा आणि न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे नाहीत. त्यांनी याआधी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे, त्यावर आम्ही समाधानी नाही. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, अशा प्रकारचे वक्तव्य पुढील काळात करणार नाही, याची हमी त्यांनी नव्या प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असेही खंडपीठाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :