पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारांतून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सोमवारी सावध सुरुवात केली. दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांच्या वाढीसह ६६,७९२ वर होता. तर निफ्टी १९,७६० वर होता. रिलायन्स आणि एफएमसीजी स्टॉक्स घसरले आहेत.
सेन्सेक्सवर एम अँड एम, एलटी, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, टीसीएस, इन्फोसिस, टाटा मोटर्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स वाढले आहेत. तर कोटक बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले आहेत.
तात्पुरत्या NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सहा दिवसांच्या खरेदीचा सिलसिला थांबवला. त्यांनी निव्वळ आधारावर १,९९९ कोटी रुपये भारतीय शेअर्स ऑफलोड केले, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,२९१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
हे ही वाचा :