Latest

Stock Market Updates | दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स ५४९ अंकांनी वधारून ५८,९६० वर बंद

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Updates : आशियाई बाजारातील तेजी तसेच आरबीआयने महागाई कमी होण्याचे दिलेले संकेत यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार वधारला. सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स तेजीत आहे. आज मंगळवारी (दि.१८) सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स सुमारे ५५० अंकांनी वाढून ५८,९०० वर खुला झाला. तर निफ्टी सुमारे १५० अंकांनी वाढून १७,४०० वर होता. त्यानंतर सेन्सेक्स ५४९ अंकांनी वधारून ५८.९६० वर बंद झाला. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १७,४८६ वर बंद झाला.

आशियातील बाजारांत तेजी

ब्रिटनच्या वित्तीय धोरणातील नाट्यमय यू-टर्नने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक तयार झाले आहे. यामुळे आशियातील समभागांनी मंगळवारी उच्चांक गाठला. तर अमेरिकी डॉलर निचांकी पातळीवर गेला आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी वाढला, तर जपानचा Nikkei ०.६ टक्क्यांनी वधारला आहे. S&P 500 फ्यूचर्स आणि Nasdaq फ्यूचर्स दोन्ही ०.८ टक्क्यांनी वाढले आहेत. (Stock Market Today) टोकियोचे शेअर्स मंगळवारी वधारल्याचे दिसून आले. बेंचमार्क Nikkei 225 निर्देशांक १.५४ टक्के म्हणजे ४१३.५६ अंकांनी वाढून २७,१८९.३५ वर होता. तर Topix निर्देशांक १.२९ टक्के म्हणजेच २४.२५ अंकांनी वाढून १,९०३.८१ वर होता. (Stock Market Today)

दरम्यान, अमेरिकी डॉलर कमजोर झाल्याने मंगळवारच्या सुरुवातीच्या आशियाई व्यापारात तेलाच्या किमती स्थिर होत्या.

महागाई कमी होण्याचे संकेत

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्याजदर वाढ थांबवावी, असे चलनविषयक धोरण समितीचे सदस्य जयंत वर्मा यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले होते. आरबीआयने सोमवारी आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले होते की, देशाचा किरकोळ महागाई दर सप्टेंबरमधील ७.४१ टक्क्याच्या उच्चांकावरून कमी होईल. RBI च्या अंदाजानंतर लगेच जयंत वर्मा यांनी व्याजदर वाढ थांबवण्याचा सूर व्यक्त केला होता.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी ३.७२ अब्ज रुपयांच्या भारतीय ($45.3 दशलक्ष) समभागांची निव्वळ विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १५.८२ अब्ज रुपयांचे समभाग खरेदी केले.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT