पुढारी ऑनलाईन : आशियातून नकारात्मक संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २८० अंकांनी घसरून ६३ हजारांच्या खाली आला. तसेच निफ्टीही (Nifty) १८,७०० च्या खाली आला. इंडेक्स हेविवेट असलेले रिलायन्स, बँकिंग आणि वित्तीय स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, सन फार्मा, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, रिलायन्स, एसबीआय हे शेअर्स घसरले आहेत. तर केवळ पॉवर ग्रिड, विप्रो, टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एनटीपीसी, कोटक बँक, टीसीएस हे शेअर्स वाढले आहेत.
IIFL सिक्युरिटीजचे शेअर्स १८ टक्क्यांनी खाली आले आहेत. बाजार नियामकाने कंपनीच्या स्टॉकब्रोकिंग युनिटला ग्राहकांच्या निधीच्या कथित गैरवापराचा हवाला देऊन दोन वर्षांसाठी कोणत्याही नवीन क्लायंटला ऑनबोर्डिंग करण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर IIFL सिक्युरिटीजचे शेअर्स घसरले आहेत. ब्लॉक डीलच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स ९ टक्के वाढले. (IIFL Securities Share Price)
MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.६९ टक्के घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग १.३५ टक्के घसरला आहे. जपानचा निक्केई निर्देशाक ०.४३ टक्के घसरून व्यवहार करत आहे.
परदेशी संस्थागत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सोमवारी भारतीय शेअर्सच्या विक्रीवर जोर दिसून आला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,०३१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्स विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ३६५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
हे ही वाचा :