Latest

Stock market updates : ‘ब्लॅक फ्रायडे’! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, क्रिप्टोकरन्सींनाही फटका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Stock market updates : कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स (BSE Sensex) शुक्रवारी सकाळच्या सत्रात तब्बल ९५० हून अधिक अंकांनी कोसळला. यामुळे सेन्सेक्स ५८ हजारांच्या खाली आला होता. तर निफ्टी (NSE Nifty) २५० हून अधिक अंकांनी खाली येऊन व्यवहार करत आहे. मुख्यत: जागतिक बाजारातील कमकुवत संकेताचा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला. इन्फोसिस शेअरमध्ये २ टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एचडीएफसी, बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्सवर बँकांचे शेअर्स देखील घसरले.

याआधीच्या सत्रात सेन्सेक्स ४६० अंकांनी वधारुन ५८,९२६ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी १४२ अंकांनी वर जाऊन १७,६०५ अंकावर बंद झाला होता. काल गुरुवारी आरबीआयने पतधोरण जाहीर केले होते. त्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती.

हिरो मोटोकॉर्प शेअर्समध्ये घसरण

हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये (Stock market updates) घसरण दिसून आली. Hero Motocorp चा निव्वळ नफा डिसेंबरच्या तिमाहीत ३६.७ टक्के कमी होऊन ६८६ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत Hero Motocorp ला १०८४ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. काल कंपनीने तिमाहीतील कंपन्यांच्या उलाढालीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर आज त्यांचे शेअर्स घसरले.

क्रिप्टोकरन्सींमध्येही घसरण

चलनवाढीची चिंता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर वाढीबाबत मिळत असलेल्या संकेतामुळे शुक्रवारी क्रिप्टोकरन्सींमध्ये मोठी घसरण दिसून आली. बिटकॉइन (Bitcoin), इथेरियम (Ethereum) आणि शिबा इनू (Shiba Inu) ६ टक्क्यांपर्यंत घसरले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT