Stock Market Opening : सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ६०,७३२ वर गेला. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली आहे. तर बँक निफ्टी सुमारे १०० अंकांनी वाढला आहे. तर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समधील घसरण कायम आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २ टक्क्यांनी खाली आला आहे.
एनएसईवर येस बँक, टाटा स्टील यांचे शेअर्स वधारले होते. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, विप्रो, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, रिलायन्स, एशियन पेंट्स हे शेअर्सदेखील तेजीत आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील प्रमुख शेअर बाजार तेजीत बंद झाले. तर आशियाई बाजारात संमिश्र वातावरण आहे. (Stock Market Opening)
हे ही वाचा :