Latest

Stock Market Crash : ड्युरेक्सने ‘म्युच्युअल फंड डिस्क्लेमर’मध्ये आणला ‘safe sex’चा ट्विस्ट, इन्स्टाग्रामवर रिल व्हायरल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : म्युच्युअल फंड्स बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत हे अस्वीकरणमध्ये म्हटले जाते. याच जोखमीच्या सूचनेला कंडोम ब्रँड असलेल्या ड्युरेक्सने एका नवी ट्विस्ट दिला आहे. ड्युरेक्सने याबाबत इन्स्टाग्रामवर एक रिल तयार केले असून ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

तुम्ही बजेटच्या मूडमध्ये आहात का? शेअर बाजार अथवा केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांमधून अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी तुमच्याकडे आल्यास तुमच्याकडे रॉक अँड रोल करण्याच्या काही योजना असू शकतात. पण सावधान, तुम्ही इथे पकडले जाल!

कारण गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर #StockMarketCrash Twitter ट्रेंड करताना दिसत आहे. त्यातून गुंतवणूकदारांसाठी, विशेषत: ज्यांनी म्युच्यूअल फंडांमध्ये गुंतवणूक केली त्यांच्यासाठी हा कालावधी इतका चांगला नाही, असे सूचित केले जात आहे. होय, 'म्युच्यूअल फंड' ही संज्ञा तुम्हाला ताबडतोब त्यामध्ये असलेला धोका पत्करु नये याची जाणीव करून देईल.

हेच तुम्हाला पुन्हा एकदा आठवता येईल का? "मुंबई फंड्स बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत…" पण थांबा, हा धोका न पत्करण्यामागे एक ट्विस्ट असून हे फक्त केवळ मनोरंजनाचा एक भाग आहे?. कारण कंडोम ब्रँड असलेल्या ड्युरेक्सने नुकताच म्युच्यूअल फंडाऐवजी 'म्युच्यूअल फन' असे नाव देऊन एक 'रंजक ट्विस्ट' त्यात आणला आहे.

ड्युरेक्स कंडोम्सने 'म्युच्युअल फंड्स'च्या धर्तीवर एक इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. हा रिल 'safe sex' वर आधारित आहे. या जाहिरातीत असे लिहिले आहे की, "तुम्ही 'safe sex' मध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फन इंटरकोर्स कोणत्याही जोखमीच्या अधीन नाही, कृपया तुमचा मार्ग काळजीपूर्वक निवडा."

या व्हिडिओमध्ये एक बैल आणि अस्वल (शेअर बाजारातील चढ-उतार दर्शवण्यासाठी असलेले दोन प्राणी) यांच्या प्रतिमा मागे वापरण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर ड्युरेक्सच्या जाहिरातीत असलेला आवाजही प्रत्येक म्युच्युअल फंड जाहिरातीच्या शेवटी वापरल्या जाणाऱ्या अस्वीकरणाच्या आवाजाशी मिळताजुळता आहे.

नुकत्याच सादर झालेला अर्थसंकल्प, शेअर बाजारातील चिंतेचे वातावरण आणि इतर विविध समस्यांमुळे सध्या चर्चेचा विषय असलेल्या ट्रेड मार्केटच्या धर्तीवर ही विचित्र जाहिरात तिचे महत्त्व अधोरेखित करते. "आम्ही सुरक्षित मार्केट #iykyk आहोत" असे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT