Latest

Stock Market Closing | शेअर बाजार सपाट; बँकिंग स्टॉक्सवर दबाव, जाणून घ्या मार्केटमधील आजच्या घडामोडी

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Closing : व्यवसायातील मजबूत स्थितीच्या तिमाही अपडेटनंतर ऑटो आणि रिअल्टी शेअर्स आज सोमवारी वधारले. या जोरावर आजच्या ट्रेडिंगच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत राहिले. पण फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या शक्यतेने नफा मर्यादित राहिला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १७७ अंकांनी वाढून ६० हजांरावर पोहोचला होता. तर निफ्टी १७,६०० च्या वर राहिला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स १३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ५९,८४६ वर बंद झाला. तर निफ्टी २४ अंकांनी वाढून १७,६२४ वर स्थिरावला. गेल्या पाच सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास ४ टक्के वाढले आहेत. आता गुंतवणुकदारांचे मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीतील कॉर्पोरेट कमाईकडे लक्ष लागले आहे.

हे टॉप गेनर्स, हे टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर आज टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, लार्सेन, एम अँड हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय, इंडसइंड बँक, नेस्ले हे टॉप लूजर्स होते. तसेच निफ्टीवर टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायजेस, ग्रासीम, हिंदोल्को हे टॉप गेनर्स होते. बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले होते.

Tata Motors शेअरची उसळी

आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सचा शेअर्स सर्वाधिक ८ टक्क्यांनी वाढला. Tata Motors ने शुक्रवारी आर्थिक चौथ्या तिमाहीत ३,६१,३६१ युनिट्स जॅग्वार लँड रोव्हरसह (JLR) घाऊक विक्रीत वार्षिक ८ टक्क्यांची वाढ नोंदवली. यामुळे टाटा मोटर्स शेअर्सनी आज उसळी घेतली. आज निफ्टी रियल्टी सुमारे ३ टक्क्यांने वाढला.

बँकिंग स्टॉक्सवर दबाव

FMCG आणि बँकिंग स्टॉक्सवर दबाव दिसून आला. बँकिंगमधील आयडीएफसी फर्स्ट बँक (-१,७३ टक्के), इंडसइंड बँक (-१.४५ टक्के), आयसीआयसीआय बँक (-०.९१ टक्के), पीएनबी (-०.७४ टक्के), ॲक्सिस बँक (-०.७३ टक्के), एचडीएफसी बँक (-०.५६ टक्के), बँक ऑफ बडोदा (-०.५१ टक्के), एसबीआय (-०.२९ टक्के), कोटक महिंद्रा (-०.०४ टक्के) हे शेअर्स घसरले होते. सॉफ्टवेअर आयटी कंपन्यांमधील टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीस, Zensar Technologies हे शेअर्स आघाडीवर होते.

गॅस दरातील कपातीनंतर अदानी टोटल गॅसचे शेअर्स वधारले

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समुहातील अदानी टोटल गॅसचे शेअर्स आज बीएसईवर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटमध्ये पोहोचला. हा शेअर ९०७.५ रुपयांवर गेला आहे. अदानी टोटल गॅसने सीएनजी दरात प्रति किलो ८.१३ रुपये आणि पाइप्ड नॅचरल गॅस दरात प्रति क्युबिक मीटर ५.०६ रुपयांची कपात केल्याने कंपनीचे शेअर्स वाढले. गेल्या काही दिवसांत अदानी टोटल गॅसचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. एखाद्या शेअरचा भाव अधिक वाढतो तेव्हा त्याला अप्पर सर्किट लागते त्याचा व्यवहार थांबतो. दरम्यान, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढले.

रियल्टी स्टॉक्स २ टक्क्याने वाढले. त्यासोबतच टायटन, एलटी, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, विप्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, आयटीसी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक, टीसीएस, टेक महिंद्रा हे शेअर्सही ‍वधारले आहेत. अदानी समुहातील अदानी पॉवर हा शेअरदेखील १.४६ टक्क्याने वाढला आहे. (Stock Market Opening)

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

आशियाई बाजारावर नजर टाकली असता जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.४२ टक्के म्हणजेच ११५.३५ अंकांनी वाढून २७,६३३ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ११.०९ अंकांनी वाढून १,९७६ वर पोहोचला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.३ टक्के घसरला होता. MSCI एशिया पॅसिफिक निर्देशांक ०.२ टक्के वाढला. तर इस्टर मुळे हाँगकाँग आणि युरोपियन बाजार बंद आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT