पहिल्याच सप्ताहात शेअर बाजारात तेजीचा उत्साह! | पुढारी

पहिल्याच सप्ताहात शेअर बाजारात तेजीचा उत्साह!

शासकीय सुट्ट्यांमुळे केवळ तीन दिवसांचे ट्रेडिंग सेशन लाभलेल्या गत सप्ताहात गुरुवार, दि. 6 एप्रिल 2023 रोजी निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले.

चार प्रमुख निर्देशांकांची गेल्या सप्ताहातील कामगिरी पुढीलप्रमाणे होती.

सेन्सेक्स – 1.43%, वाढ – 59833 वर बंद.
निफ्टी 50 – 1.38 %, वाढ – 17599.15 वर बंद.
बीएसई मिडकॅप – 1.19%, वाढ -24351.06 वर बंद.
बीएसई स्मॉलकॅप – 2.85%, वाढ -27725.34 वर बंद.

शुक्रवार, दि. 31 मार्चच्या जोमदार तेजीमुळे शिवाय त्याचदिवशी अमेरिकेच्या डाऊ जोन्सनेही 415 पॉईटंस्ची (1.26%) आकर्षक वाढ नोंदवल्यामुळे सोमवारी देखील बाजारात तेजीचा उत्साह होता. परंतु OPEC ने भविष्यातील कू्रड ऑईल किमतीमध्ये स्थैर्य आणण्याच्या इराद्याने उत्पादनात कपात करण्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला आणि तेजीला चाप बसला. ही कपात तरी किती असावी? जागतिक मागणीच्या 3.7% इतकी ही कपात आहे.

आपल्या देशाचा विचार केला, तर भारत अमेरिका आणि चीनच्या खालोखाल जगातील तिसर्‍या क्रमांकाचा क्रूड ऑईल आयात करणारा देश आहे. आपण क्रूड ऑईलचा जितका वापर करतो, त्याच्या 80 टक्क्यांहून अधिक ऑईल आपल्याला आयात करावे लागते. या मोठ्या परावलंबित्वामुळे क्रूड ऑईलच्या दरातील वाढीमुळे आपल्या देशापुढे पुढील समस्या निर्माण होतात.

1. Current Account Deficit (देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तूट)
2. Dollar – Rupee Exchange Rate (डॉलर रुपयाच्या विनियमयात डॉलरचा दर वाढतो)
3. Rise in inflation (महागाईत वाढ)
4. Fiscal Deficit (वित्तीय तूट – सरकारच्या उत्पन्न आणि खर्चातील तूट)
5. Forex Reservs (परकीय गंगाजळी कमी होते)
6. Growth Concerns (देशाची एकूण वाढ खुंटते)

गुरुवार, दि. 6 एप्रिल रोजी Crude oil (WIT) बंद भाव रु 80.70 होता. तो 85 रुपयांच्या पुढे गेला तर भारताची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि तज्ज्ञांनी तर तो 100 रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

मार्च 2023 चे Auto Sales चे आकडे गत सप्ताहात प्रसिद्ध झाले. सर्वच आघाड्यांवर YOY बेसिसवर हे आकडे थोडे अधिक Nifty Auto Index मध्ये वाढ झाली. (YOY – Year on Year) मार्च 2022 आणि मार्च 2023 चे तुलनात्मक आकडे) हिरो मोटो, बजाज ऑटो, मारुती सुझुकी हे सर्वच शेअर्स हिरव्या रंगात न्हाऊन निघाले.

गेल्या आठवड्यातील बहुचर्चित event होता तो म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या Monetary Policy Committee च्या मीटिंगचा! महागाईचा दर (Infiation Rate) 6.35 टक्के राहण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तो 6.44 टक्के घोषित झाल्यामुळे रिझर्व्ह बँक रेपो रेट पाव टक्के वाढवेल, असे 90 टक्के तज्ज्ञांना वाटत होते. परंतु तात्पुरती विश्रांती घेत असल्याच्या टिप्पणीसह का होईना; परंतु रिझर्व्ह बँकेने व्याज दर ‘जैसे थे’ ठेवले आणि बाजारात सकारात्मक हालचाल झाली. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि रिअल इस्टेट शेअर्स वधारले. Chota Investment and Finance 7.51%, M. & M. Financial 5.28% तर Bajaj Finance 2.97% वाढले. रियल इस्टेटमध्ये DLF आणि Oberoi Realty चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढले, तर गोदरेज प्रॉपर्टीज साडे सहा टक्के वाढला.

पुढील आठवड्याचा विचार करता FII खरेदी वाढवण्याच्या मूडमध्ये दिसतात. ऑप्शन चेनवरून निफ्टीला 17300, 17200 आणि 17000 च्या पातळ्यावर भक्कम आधार दिसतो. याउलट 17500 वर निफ्टीला मोठा विरोध दिसत असतानाही निफ्टी 17600 च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. याच आठवड्यात तो 18000 पर्यंत जाईल काय? कारण क्यू फोर म्हणजे गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहींचे आणि एकूणच वर्षाचे आर्थिक निकाल येण्यास याच आठवड्यात प्रारंभ होईल. ते जितके चांगले येतील, तितका बाजार जोमाने वर जाईल.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस् लि. ही टाटा ग्रुपची Food and Beverages क्षेत्रातली अनेक देशांत विस्तार असलेली दर्जेदार कंपनी आहे. जवळपास 68000 कोटी रु. तिचे मार्केट कॅप आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तिने 20 टक्के सरासरी नफा मिळवलेला आहे. 861 रु. हा 52 Week High असलेला हा शेअर आज रु. 730 ला मिळतो आहे. RSI 62 आहे. 30 दिवसांच्या आणि 50 दिवसांच्या Moving Average च्या वरती हा शेअर आज टे्रड करतो आहे. येत्या दिवाळीपर्यंत म्हणजे सात महिन्यांमध्ये हा शेअर 800 रु. पर्यंत गेला तरी साडे सोळा टक्के CAGR रिटर्नस् मिळतील. अर्थात बाजाराचा अस्थिरता हा स्थायिभाव आहे, हे सदैव लक्षात ठेवूनच!

भरत साळोखे
संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

Back to top button