Latest

Stock Market Closing | सेन्सेक्स ५८ हजारांखाली, IT-PSU बँकिंग स्टॉक्स घसरले, जाणून घ्या मार्केटची आजची स्थिती

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Closing : जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आहे. दरम्यान, अमेरिका, युरोपमधील बँकिंग क्षेत्र संकटात असतानाही वाढती महागाई रोखण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली. पण युरोपसह जगभरातील बाजारात घसरण झाली. आज गुरुवारी (दि. २३) भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. तर निफ्टी १७,१०० च्या खाली होता. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास दोन्ही निर्देशांकांची घसरण थांबून त्यांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. दुपारच्या सत्रात दिवसाच्या निचांकावरून सेन्सेक्स ५०० अंकांनी सावरला. दुपारी सेन्सेक्स १३० अंकांच्या वाढीसह ५८,३४५ वर होता. तर निफ्टीने १७,१८९ वर व्यवहार केला. त्यानंतर आजच्या व्यवहारातील दुसऱ्या टप्प्यात विक्रीचा जोर दिसून आला. यामुळे दोन्ही निर्देशांक पुन्हा घसरले. आज सेन्सेक्स २८९ अंकांनी घसरून ५७,९२५ वर बंद झाला. तर निफ्टी ७५ अंकांच्या घसरणीसह १७,०७६ वर स्थिरावला.

युरोपच्या बाजारातील कमजोर स्थितीचा आज भारतीय शेअर बाजारात प्रभाव दिसून आला. आजच्या व्यवहारात १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० निर्देशांकांनी आघाडी घेतली. त्यात फायनान्सियल स्टॉक्स ०.२ टक्के वाढले. तर माहिती तंत्रज्ञान (IT) स्टॉक्सचे सुमारे १ टक्के नुकसान झाले. त्यात एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, इन्फोसिस आणि Persistent System चा समावेश होता. आज बाजारातील विक्रीचा टेक्नॉलॉजी शेअर्सवर दबाव राहिला.

'हे' शेअर्स वाढले, 'हे' घसरले

अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढले. बाजारातील रिकव्हरीला ऑटो, एफएमसीजी शेअर्समुळे आधार मिळाला. जगभरातील बाजारात तेजी परतल्याने भारतीय बाजारात रिकव्हरी होताना दिसून आली. निफ्टीवर हिंदाल्को (१.८ टक्के वाढ), मारुती (१.२ टक्के वाढ), नेस्ले (१ टक्के वाढ) आणि टाटा मोटर्स (१ टक्के वाढ) हे शेअर्स तेजीत होते. तर एशियन पेंट्स (-२ टक्के), एचसीएल टेक (-१.२ टक्के), विप्रो (-१ टक्के), इन्फोसिस (-१ टक्के) या शेअर्समध्ये घसरण झाली.

PSU बँक स्टॉक्समध्ये कमजोरी

PSU बँक स्टॉक्समध्ये आज सुस्ती दिसून आली. बँक ऑफ इंडिया (-०.८० टक्के), युको बँक (-०.८० टक्के), बँक ऑफ बडोदा (-०.६९ टक्के), आयडीबीआय बँक (-०.५३ टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (-०.४४ टक्के), इंडियन ओव्हरसीज बँक (-०.४३ टक्के), पंजाब नॅशनल बँक (-०.३१ टक्के), युनियन बँक ऑफ इंडिया (-०.२३ टक्के) यांचा समावेश होता. (Stock Market Closing)

Hero MotoCorp वधारला, वेदांताचा शेअर घसरला

वैयक्तिक स्टॉक्समध्ये Hero MotoCorp चा शेअर १ टक्क्याने वाढला. कंपनीने १ एप्रिलपासून काही निवडक दुचाकी मॉडेल्सच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर निफ्टी ५० वर Hero MotoCorp टॉप गेनर्स होता. दरम्यान, वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. हा शेअर सुमारे ६ टक्क्यांनी घसरला. वेदांताची मूळ कंपनी वेदांत रिसोर्सेस त्यांचे काही भागभांडवल विकण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT