पुढारी ऑनलाईन : HDFC च्या दोन्ही शेअर्समधील विक्रीचा सपाटा आणि प्रतिकूल जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ६१ हजारांपर्यंत खाली आला. तर निफ्टी १८,१०० च्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ६९४ अंकांनी घसरुन ६१,०५४ वर बंद झाला. तर निफ्टी १८६ अंकांच्या घसरणीसह १८,०६९ वर स्थिरावला. सेन्सेक्सची आजची घसरण ही १.१३ टक्के आहे. निफ्टी १.०२ टक्क्यांनी खाली आला. बाजारातील या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) १.४३ लाख कोटींनी कमी होऊन २७३.७७ लाख कोटींवर आले. फायनान्सियल स्टॉक्समुळे आज बाजारावर दबाव दिसून आला. पण FMCG आणि ऑटो स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. (Stock Market Closing)
सेन्सेक्सवर एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरले. इंडसइंड बँक, टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, एम अँड एम, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक हेदेखील घसरले. Manappuram Finance चा शेअर्स १३ टक्क्यांनी घसरला. तर टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, नेस्ले इंडिया, एलटी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स टॉप गेनर्स होते. (Stock Market Opening)
TVS मोटर्सच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. चौथ्या तिमाहीत TVS Motors ने नफ्यात ४९ टक्के वाढ नोंदवली आहे. यामुळे कंपनीचा शेअर वधारला आहे. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर हा शेअर १,२२८ रुपयांवर व्यवहार करत होता. तो मागील बंदच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढला.
निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस १.२४ टक्के आणि निफ्टी बँक ०.६१ टक्के घसरला. तर, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, consumer durables, ऑईल अँड गॅस स्टॉक्स वाढले आहेत. (Stock Market Closing)
बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे प्रादेशिक बँकिंग शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. परिणामी गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.९ टक्के घसरून ३३,१२८ वर आला. S&P 500 निर्देशांक ०.७ टक्के खाली येऊन ४,०६१ वर आला. तर टेक-रिच नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.५ टक्के घसरून ११,९६६ वर आला.
दरम्यान, अमेरिकेच्या बाजारातील घसरणीचा मागोवा घेत आशियाई बाजारांनी संमिश्र व्यवहार केला. हाँककाँगचा हँग सेंग १ टक्क्यांहून अधिक वाढला. पण शांघाय बाजारात घसरण दिसून आली. तर जकार्ता, सिंगापूर, क्वालालंपूर आणि मनिला येथील बाजार घसरले होते. टोकियो आणि सेऊल येथील सुट्टीनिमित्त बंद होते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सचे निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. त्यांनी गुरुवारी १,४१४ कोटी रुपयांची शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, FII ने मे महिन्यात १०,८५० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.
हे ही वाचा :