Latest

Stock Market Closing Bell | सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वाढून बंद, मार्केटमध्ये काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात तेजीचा माहौल राहिला. आज सलग दुसऱ्या बाजार वधारुन बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्स ३६४ अंकांच्या वाढीसह ६५,९९५ वर स्थिरावला. तर निफ्टी १०७ अंकांनी वाढून १९,६५३ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

रिअल्टी निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढला. तर आयटी, एफएमसीजी, मेटल, ऑटो, पॉवर, हेल्थकेअर ०.४ ते १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढून बंद झाले. रोखे बाजारातील विक्री थांबल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकेत सकारात्मक होते. तसेच आरबीआयच्या पतधोरणानंतर दराबाबत संवेदनशील स्टॉक्स वाढण्यास मदत झाली. आज सर्व क्षेत्रीय आघाडीवर व्यापक खरेदी दिसून आली.

दरम्यान, आधीच्या ८३.२५ बंदच्या तुलनेत भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.२४ वर सपाट पातळीवर झाला.

सेन्सेक्स आज ६५,८६७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६ हजारांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्हचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ६ टक्क्यांनी वाढून १,६३८ रुपयांवर पोहोचला. बजाज फायनान्सचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून ८,१७७ रुपयांवर गेला. टायटन ३ टक्क्यांनी वाढून ३,३१७ रुपयांवर पोहोचला. इंडसइंड बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. टेक महिंद्रा, मारुती, टीसीएस, एनटीपीसी, सन फार्मा या शेअर्सनीही हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टायटन, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स टॉप गेनर्स राहिले. हे १ ते ५.५८ टक्क्यांदरम्यान वाढले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, कोल इंडिया, एशियन पेंट्स, ओएनजीसी, भारती एअरटेल यात घसरण दिसून आली. (Stock Market Closing Bell)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर ६.५० टक्के एवढा कायम आज सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT