पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारपेठांमधील नकारात्मक संकेतांचे पडसाद आज ( दि.१७ देशातंर्गत शेअर बाजारावर सलग दुसर्या दिवशी उमटले. शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सलग दुसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांनी नफा वसुलीकडेच लक्ष दिले. शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याने खळबळ उडाली.आज व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरून 71,500 वर आला. निफ्टीही 460 अंकांच्या घसरणीसह 21,571 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि धातू क्षेत्रात नोंदवण्यात आली. बँक निफ्टी निर्देशांक 4.25 टक्क्यांनी घसरला, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेचे शेअर्स सर्वाधिक 8 टक्क्यांनी घसरले.
शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी सोमवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मंगळवारी ( दि.१६) सेन्सेक्स १९९ अंकांनी घसरून ७३,१२८ वर बंद झाला होता. मात्र आज जागतिक बाजारपेठांमधील नकारात्मक परिणामाचे पडसाद देशातंर्गत शेअर बाजारावर उमटले. लार्जकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी वाढलेल्या घसरणीच्या आघाडीसह व्यापक निर्देशांक लाल रंगात उघडले. सकाळ बाजारात व्यवहार सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला आणि 71,700 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीही सुमारे 400 अंकांनी घसरून 21,650 च्या खाली घसरला. बँकिंग, वित्तीय आणि धातू क्षेत्रात सर्वाधिक विक्री बाजारात नोंदवली गेली. सलग दुसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांनी नफा वसुलीकडेच लक्ष दिले. शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याने खळबळ उडाली .
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीच्या 50 पैकी 41 शेअर्सची विक्री झाली. तर निफ्टी बँकेच्या सर्व 12 समभागांमध्ये घसरण झाली. लार्जकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी वाढलेल्या घसरणीच्या आघाडीसह व्यापक निर्देशांक लाल रंगात उघडले.एचसीएल टेक, एसबीआय लाईफ, एलटीआईमाइंडट्री, इन्फोसिस आणि टीसीएस हे निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि हिंदाल्को हे निफ्टी 50 मध्ये आघाडीवर होते.
शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सकाळी 9.40 वाजता 373.53 लाख कोटी रुपये झाले, जे 16 जानेवारी रोजी बाजार बंद झाल्यानंतर 374.95 लाख कोटी रुपये होते. बँक निफ्टी निर्देशांक 1551.15 अंकांनी किंवा 3.22 टक्क्यांनी घसरून 46,573.95 वर स्थिरावला.. सलग पाच सत्रांमधील 'तेजीमय' उत्साहानंतर बाजारातील आज सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीमागील प्रमुख कारणे जाणून घेवूया…
शेअर बाजारातील आजच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे एचडीएफसी बँक ठरली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये या समभागाचे मोठे प्राबल्य आहे. आज एचडीएफसी बँकेचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह उघडले. बँकेचा डिसेंबर तिमाहीचा निव्वळ नफा आणि निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय ) बाजाराच्या अपेक्षेनुसार होते; परंतु तिमाही आधारावर फ्लॅट मार्जिनने गुंतवणूकदारांची निराशा केली. बँकेला अतिरिक्त भांडवलाचा फायदा होताना दिसत नसल्याचे फ्लॅट मार्जिनने स्पष्ट केले.
बाजारातील घसरणीचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे व्याजदरात तीव्र कपातीची अपेक्षेला खिळ बसली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'ने सूचित केले की, पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा कमी वेगाने व्याजदर कमी करू शकते. त्यामुळे बाजारातील उत्साह कमी झाला आहे. 'फेड'चे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी स्पष्ट केले आहे की, केंद्रीय बँक यावर्षी दर कमी करेल, परंतु प्रक्रियेस वेळ लागू शकतो.
सलग पाच दिवस 'तेजीमय' उत्साह अनुभवल्यानंतर ट्रेंडमधून गुंतवणूकदारांनी गेली दोन दिवस नफा बसुलीकडे लक्ष दिले. त्यामुळे . बँकिंग, वित्तीय आणि धातू क्षेत्रात सर्वाधिक विक्री बाजारात नोंदवली गेली. विश्लेषकांचे मते, मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून ही घसरण चांगली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना प्रत्येक घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक बाजारपेठांमधील नकारात्मक संकेतांचे पडसाद आज ( दि.१७ देशातंर्गत शेअर बाजारावर सलग दुसर्या दिवशी उमटले. रोखे उत्पन्न वाढल्यामुळे अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक तोट्यासह बंद झाले. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग तोट्यातच दिसले. मात्र, जपानचा निक्केई निर्देशांक नफ्यात व्यवहार करत होता. अमेरिकेतील शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारताच्या बाजारावर झाला. आशियाई बाजारपेठांवर परिणाम करणारा चीनचा आर्थिक विकास हा आणखी एक घटक ठरला, डिसेंबर तिमाहीत चीनचे सकल राष्ट्रीय उत्त्पन्न दर 5.2 टक्के होता. याचा परणिाम हाँगकाँग, कोरिया, चीन, तैवान आणि भारतातील बाजारांवर दिसत असल्याचे अर्थ विश्लेषक सांगतात.
हेही वाचा :