अर्थभान : घरबसल्या पॅनकार्डमध्ये सुधारणा करा

Published on
Updated on

पॅनकार्डशिवाय आता बँक व्यवहार शक्य नाही म्हणून देशातील बहुतांश नागरिकांनी पॅनकार्ड काढलेले आहे. तसेच अनेकांनी पॅनकार्डसाठी अर्जदेखील असेल. मात्र जेव्हा पॅनकार्डमध्ये काही किरकोळ चुका होतात तेव्हा पॅनकार्डधारकांची अडचण अधिकच वाढते. चुकीची जन्मतारीख, नावातील स्पेलिंगमध्ये गडबड, अस्पष्ट फोटो, चुकलेली सही आदींमुळे पॅनकार्डधारकाला व्यवहार करताना अडचणी येतात. परंतु पॅनकार्डमध्ये काही त्रुटी असल्या तरी हताश होण्याचे कारण नाही. आपण घरबसल्या ऑनलाईनवर पॅनकार्डमध्ये नावात बदल करू शकतो किंवा जन्मतारखेबरोबरच अ‍ॅड्रेस अपडेट करू शकता. 

सर्वप्रथम आपल्याला जर नाव बदलायचे असेल तर आपले मूळ नाव असलेल्या कागदपत्राची सत्यप्रत जवळ ठेवा. त्यात पासपोर्ट, व्होटर आयडी, जन्माचा दाखला या कागदपत्रांचा समावेश आहे. 

सर्वप्रथम आपण ऑनलाईन सर्व्हिस डॉट एनएसडीएल डॉट कॉम/पॅन/एंडयूजर रजिस्ट्रेशन कॉन्टँट डॉट एचटीएमएल या लिंकने वेबपोर्टल सुरू करा. त्यात अप्लिकेशन टाईपमध्ये चेंज अँड करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटाच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता या श्रेणीत इंडिव्युजलची निवड करायची आहे. त्यानंतर खाली येणार्‍या रकान्यात खरी माहिती भरा. मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल आयडी भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा. त्यानंतर सबमिटच्या बटणावर क्लिक करा. यानंतर नवीन पेज दिसू लागेल आणि तेथे आपल्याला चार पर्याय दिसू लागतील. यावर आपल्याला आधार नंबर आणि पॅन नंबर भरावा लागेल. प्रत्येक बाब काळजीपूर्वक भरा. किरकोळ चूकही आपल्याला पुन्हा अडचणीत आणू शकते. 

ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रांची कॉपी सबमिट करावी लागेल आणि त्यासोबत 120 रुपये भरावे लागतील. त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसू लागेल. तो फॉर्म आपण सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून ठेवू शकता. अर्ज दिल्यानंतर आपण दिलेल्या पत्त्यावर दोन आठवड्यात पॅनकार्ड येते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news