New TV Show  
Latest

New TV Show : नवीन तीन शो येताहेत भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार भारतने 'सौभाग्यवती भव: नियम और शर्तें लागू', 'सावधान इंडिया: क्रिमिनल डिकोडेड' आणि 'मे आय कम इन मॅडम?' या तीन प्रेक्षकांच्या आवडत्या शोच्या नवीन सीझनची घोषणा केलीय. 'सावधान इंडिया: क्रिमिनल डिकोडेड' चा १४ वा सीझन घेऊन येत आहे. (New TV Show ) या सीझनमध्ये ज्येष्ठ अभिनेते सुशांत सिंगचे होस्ट म्हणून पुनरागमन होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी स्टार भारतवर प्रीमियर होणारा हा शो दर सोमवार-शनिवारी रात्री १०:३० वाजता प्रसारित होईल. (New TV Show )

एडिट II प्रॉडक्शन निर्मित, 'मे आय कम इन मॅडम?' चा नवीन सीझन साजन (संदीप आनंदने साकारलेला पात्र), संजना (नेहा पेंडसेने साकारलेला पात्र) आणि त्यांच्या ऑफिसमधल्या अनेक विनोदी किसे पुन्हा जीवंत करतील. विनोदी आणि हास्याने भरलेल्या या सीझनचे नवीन भाग प्रेक्षकांना नक्कीच हसवतील. ही कथा साजनच्या विनोदी पेचांवर प्रकाश टाकते. २६ सप्टेंबर रोजी स्टार भारतवर प्रीमियर होणारा हा शो दर सोमवार-शनिवारी रात्री ९:३० वाजता प्रसारित होईल.

बॉम्बे शोस्टुडिओ एलएलपी निर्मित 'सौभाग्यवती भव: नियम और शर्तें लागू' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राघव (धीरज धूपरने साकारलेला पात्र), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) एक्स्पर्ट आहे ज्याला प्रेम समजत नाही आणि सिया (अमनदीप सिद्धूने साकारलेला पात्र) स्वप्न पाहणारी मुलगी यांच्याभोवती कथा फिरते. जो नेहमी तिच्या जोडीदाराला साथ देतो. या शोमध्ये विराज डोबरियाल (करणवीर बोहरा यांनी साकारलेले पात्र) या अगोदर कधीही न पाहिलेल्या अवतारातील प्रतिष्ठित व्यक्तिरेखा पुन्हा सादर केली आहे.२६ सप्टेंबर रोजी स्टार भारतवर प्रीमियर होणारा हा शो दर सोमवार-शनिवारी रात्री १० वाजता प्रसारित होईल.

अभिनेता सुशांत सिंग म्हणतात, 'सावधान इंडिया: क्रिमिनल डिकोडेड'च्या आगामी सीझनचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. या सीझनमध्ये आम्ही गुन्हेगारी कारवायांमध्ये खोलवर जाऊन नवीन दृष्टीकोन आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे."

अभिनेता धीरज धूपर म्हणतो, "प्रत्येक पात्र अतिशय खास आहे. या व्यक्तिरेखेबद्दल मी खूप उत्सुक आहे कारण हे पात्र खूप आव्हानात्मक आहे आणि ते मी साकारलेल्या पूर्वीच्या पात्रांपेक्षा खूप वेगळे आहे."

अभिनेता करणवीर बोहरा म्हणाला, "विराज डोबरियालची भूमिका पुन्हा एकदा साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. व्यक्तिशः, ही भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे."

अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणते, "मी 'मे आय कम इन मॅडम? नवीन एपिसोड्ससह शो परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आणि यावेळीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आम्हाला आशा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT