संग्रहित छायाचित्र. 
Latest

पाकिस्‍तानमधील कराचीत रेशन वाटपावेळी चेंगराचेंगरी, १२ ठार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानात लोकांची अन्नान्नदशा झाली आहे. भूकेने व्‍याकूल झालेले लोकांना अन्‍नासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. यातूनच रेशनचे धान्‍य घेण्‍यासाठी मोफत धान्‍य वाटप केंद्रांवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी ( दि. ३१) कराची शहरामध्ये या केंद्रावर चेंगराचेंगरीत झाली. या दुर्घटनेत १२ जण मृत्‍युमुखी पडले आहेत. मृतांत आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रमजाननिमित्त कराची येथील धान्‍य वितरण केंद्रात गरिबांना पीठासह अन्‍य गोष्टींचे वाटप केले जात होते. पाकिस्तानमध्ये महागाईमुळे पिठाची किंमत १६० रुपये किलोवर पोहोचली आहे, सरकार या केंद्रांद्वारे स्वस्त आणि मोफत पीठ उपलब्ध करून देत आहे.
शुक्रवारी सायंकाळी पीठासाठी एकच गर्दी उसळली. यावेळी लोकांनी एकमेकांना ढकलण्‍यास सुरुवात केली. दोन महिला आणि दोन मुले जवळच्‍या नाल्‍यात पडले. तर चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्‍यू झाला. २९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर घटना घडल्‍यानंतर उपस्‍थित पोलिसांनी पलायन केल्‍याचा दावा प्रत्‍यक्षदर्शींनी केला आहे.

मागील आठवड्यात पंजाब प्रांतातही गेल्या आठवडाभरात सरकारकडून मोफत वाटले जाणारे पीठ गोळा करण्यासाठी चेंगराचेंगरीच्या काही घटना घडल्या आहेत. मुलतान, मुझफ्फरगड आणि फैसलाबाद शहरात अशा घटना घडल्या. आता कराचीमधील दुर्घटनेमुळे पाकिस्तानमधील मोफत अन्न केंद्रांवर चेंगराचेंगरीत मृतांची संख्या किमान २४ वर पोहोचली आहे.

सर्वच धान्‍य वितरण केंद्रांवर गोंधळ

रमजान महिन्यात सुमारे १.५८ कोटी कुटुंबांना मोफत गव्हाचे पीठ दिले जाईल, अशी घोषणा पाकिस्‍तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी केली आहे. त्यासाठी पाकिस्तानात 20 हजार अतिरिक्त वितरण केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. सर्वच केंद्रांवर गोंधळ सुरू आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT