Latest

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब; संतप्‍त जमावाने १२ मंत्र्यांची घरे दिली पेटवून, भारतीयांसाठी हेल्‍पलाईन जारी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्‍यात आली आहे. ( Sri Lanka Economic Crisis ) साेमवारी पंतप्रधान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. यानंतर राजपक्षे समर्थक आणि विराेधकांनी राजधानी काेलंबाेसह विविध शहरात जाळपाेळ सुरु केली आहे. संतप्‍त जमावाने पंतप्रधान राजपक्षे यांच्‍या वडिलाेपार्जित घरासह तब्‍बल १२ मंत्र्यांची घरे पेटवून दिली आहेत.

माजी मंत्री फर्नांडो यांना कारसह तलावात फेकले

राजपक्षे समर्थक आणि विरोधक अनेक ठिकाणी आमने-सामने आल्‍याने देशभरात विविध ठिकाणी हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. संतप्‍त जमावाने तब्‍बल १२ मंत्र्यांची घरे पेटवून दिली. तसेच महिंदा राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घरही पेटवून दिले. जमावाने राजधानी कोलंबोमध्‍ये माजी मंत्री जॉनसन फर्नांडो यांना कारसहित तलावात फेकले. दरम्‍यान, श्रीलंकेत अडकलेल्‍या भारतीयांसाठी परराष्‍ट्र मंत्रालयाने हेल्‍पलाईन नंबर जारी केला आहे. देशातील कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडल्‍याने नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन श्रीलंकेच्‍या बार असोसिएशनने केले आहे.

'एएफपी' वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी हजारो नागरिकांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्‍या निवासस्‍थानावर चाल केली. त्‍याच्‍या टेम्‍पल ट्री बंगल्‍याचे प्रवेशव्‍दार तोडले. येथे उभा असलेल्‍या ट्रकला आग लावली. जमावाला नियंत्रणात आणण्‍यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्‍या कांड्या फोडल्‍या तसेच हवेत गोळीबारही केला. दरम्‍यान,राजपक्षे यांच्‍या निवासस्‍थानावर झालेल्‍या हल्‍ल्‍यास श्रीलंका पोडुजाना पेरामुना पक्षाला जबाबदार आहे, असा आराेप श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने केला आहे.

जमावाच्‍या मारहाणीत खासदाराचा मृत्‍यू

पोदुजाना पेरामुना मतदारसंघाचे खासदार अमराकिर्ती अथुकोराला यांनी संतप्‍त जमावाला पांगविण्‍यासाठी हवेत गोळीबार केला. यावेळी जमावाने त्‍यांना बेदम मारहाण केली. यामध्‍ये त्‍यांचा मृत्‍यू झाला. एका इमारतीमध्‍ये त्‍यांचा मृतदेह सापडल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Sri Lanka Economic Crisis : राजपक्षेंना अटक करा : विरोधी पक्षाची मागणी

श्रीलंकेला आर्थिक संकटात लोटणार माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना तत्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांनी केली आहे. राजपक्षे विराेधक शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करत आहेत. त्‍यांना टार्गेट केले जात आहे. आतापर्यंत राजपक्षे समर्थकांच्‍या हल्‍लात ५ जण ठार झाले असून २०० हून अधिक आंदोलनकर्ते गंभीर जखमी आहेत. यासर्व परिस्‍थितीस महिंदा राजपक्षेच जबाबदार असून, त्‍यांच्‍यावर कडक कायदेशीर कारवाई करण्‍यात यावी, असे आग्रही मागणी विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांकडून होत आहे.

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात एका महिन्‍यात दोनवेळा आणीबाणी लागू करण्‍यात आली आहे. अशा संकटातच पंतप्रधान पंतप्रधान महिंदा राजपक्षे ( Mahinda Rajapaksa ) यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा राष्‍ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्‍याकडे दिला. यानंतर परिस्‍थिीत अधिक चिघळली आहे. राजीनामा दिल्‍यानंतर राजपक्षे यांनी केलेल्‍या ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं होतं की, " नागरिकांना संयम पाळावा. जेव्‍हा भावनिकदृष्‍ट्या आपण विचार करतो तेव्‍हा नेहमी लक्षात ठेवायला हवे की, हिंसा केवळ हिंसेला जन्‍म देते. देशावर आलेल्‍या आर्थिक संकटाला एक आर्थिक समाधान मिळण्‍याची गरज आहे. देशावर आलेल्‍या आर्थिक संकटावर मात करण्‍यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे."

अमेरिकेने व्‍यक्‍त केली चिंता

महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्‍याने आता श्रीलंकेत अंतरिम सरकार स्‍थापन होण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे. येथील सर्व परिस्‍थितीवर आमची नजर आहे. शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करणार्‍यांवर होणारे हल्‍ले चिंताजनक आहेत, असे अमेरिकेने म्‍हटलं आहे. तसे

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT