vaibhav suryavanshi record break ipl debut creates 7 big new records
भारतीय क्रिकेटमध्ये दरवर्षी नवे चेहरे चमकत असतात, पण काही खेळाडू असे असतात जे आपल्या प्रतिभेने आणि आत्मविश्वासाने थेट चाहत्यांच्या मनात घर करतात. अशाच चमकत्या नव्या चेहऱ्याचं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी.
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती 14 वर्षीय वैभवची. त्याने त्याच्या पहिल्याच आयपीएल हंगामात असा खेळ दाखवला की सर्वजण निश्चितच प्रभावित झाले.
वैभवला एकूण 7 सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या. यादरम्यान, वैभवच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी झळकली. वैभवने त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच 5 मोठे विक्रम केले जे येत्या हंगामात मोडणे अशक्यक असेल.
आयपीएलमधील सर्वात कमी वयात शतक
वैभवने 28 एप्रिल 2025 रोजी जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले. वय 14 वर्षे आणि 32 दिवस असताना त्याने हा विक्रम नोंदवला, ज्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मनीष पांडे यांच्या नावावर होता (2009, वय 19 वर्षे 253 दिवस).
आयपीएलमधील भारतीयाचा सर्वात वेगवान शतक
वैभवने 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, ज्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम यूसुफ पठान यांच्या नावावर होता (37 चेंडूंमध्ये, 2010).
टी-20 क्रिकेटमधील सर्वात कमी वयात शतक
जागतिक टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात युवा खेळाडू म्हणून वैभवच्या नावावर हा विक्रम आता नोंदला गेला आहे. वैभवने 14 वर्षे 32 दिवसांचे वय असताना टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकले.
आयपीएलमधील सर्वात कमी वयात पदार्पण
वैभवने 14 वर्षे आणि 23 दिवसांच्या वयात आयपीएल 2025 मध्ये पदार्पण केले, ज्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपल्या धडाकेबाज शैलीची चुणूक दाखवली.
11 षटकार
आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा अनकॅप्ड खेळाडू होण्याचा विक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदला गेला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवने त्याच्या शतकी खेळीदरम्यान एकूण 11 षटकार ठोकले. यादरम्यान त्याने इशान किशनचा विक्रम मोडला.
चौकारांसह 40 धावा
वैभव हा टी-20 सामन्यात फक्त चौकारांसह 40 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. हे विक्रम क्वचितच मोडता येतील.