यशस्वी जैस्वालने मोडला गावस्करचा विक्रम BCCI
स्पोर्ट्स

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने मोडला गावस्करचा 'तो' विक्रम

IND VS AUS Test Live| अशी कामगिरी करणारा बनला पहिला खेळाडू

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. जोश हेझलवूडच्या चेंडूवर गगनचूंबी षटकार ठोकून त्याने शतक पूर्ण केले. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

IND VS AUS Test Live | 46 वर्षांनी घडले असे

पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वीला खातेही उघडता आले नाही. यानंतर दुसऱ्या डावात त्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि आपल्या नैसर्गिक खेळाच्या विरुद्ध खेळत शतक झळकावले. ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरला. यशस्वीच्या आधी सुनील गावस्कर आणि एम जयसिम्हा यांनी ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत शतके झळकावली होती. यशस्वीला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. जयसिंहाने 1967-68 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हे केले आणि गावस्कर यांनी 1977 मध्ये केले. म्हणजेच ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी हा 46 वर्षांतील पहिला भारतीय फलंदाज आहे. योगायोगाने ही तिन्ही शतके भारताच्या दुसऱ्या डावात झाली.

IND VS AUS Test Live| यशस्वीने मोडला गावस्करचा विक्रम

पहिल्या डावामध्ये खातेही न उघडता बाद झाल्यानंतर यशस्वीने दमदार शतक ठोकले. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या सामन्यात शतक झळकवले. यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या सामन्यात उच्चांकी खेळी केली. या आधी हा विक्रम सुनिल गावस्कर यांच्या नावे होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर खेळलेल्या पहिल्या सामन्यात 113 धावांची दमदार खेळी होती. हा विक्रम आता यशस्वीने मोडला आहे. यशस्वी सध्या 128 धावांवर नाबाद खेळत आहे.

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी सामन्यात शतके झळकावणारे भारत

  • 101 - एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, 1967-68

  • 113 - सुनील गावस्कर, ब्रिस्बेन, 1977-78

  • 128* - यशस्वी जैस्वाल, पर्थ, 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT