स्पोर्ट्स

WTC Final : डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना मोबाईलवर ‘फ्री’मध्ये पहा, वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगशी संबंधित जाणून घ्या माहिती

WTC Finalकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल, तर द. आफ्रिका पहिल्या विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल.

रणजित गायकवाड

wtc final south africa vs australia live streaming timing venue squad details

क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2023-25 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगणार आहे. या लढतींकडे तमाम क्रिकेटरसिकांचे डोळे लागले आहेत. भारतीय चाहतेही यात मागे नाहीत. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर 11 जूनपासून हा महामुकाबला खेळवला जाईल. कसोटी क्रिकेटचा जागतिक बादशाह कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा अंतिम सामना कसोटी क्रिकेटच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला साजेसा, रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल, ज्यामुळे क्रिकेटरसिकांना एक दर्जेदार लढत पाहायला मिळेल.

WTC Final : कांगारू सलग दुसऱ्यांदा, द. आफ्रिका प्रथमच

ऑस्ट्रेलियन संघासाठी हा सलग दुसरा WTC अंतिम सामना असणार आहे. यापूर्वी 2021-23 च्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे, सलग दुसऱ्यांदा हा मानाचा किताब जिंकून इतिहास रचण्याची संधी कांगारूंकडे आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला असून, ते आपले पहिले WTC विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत. 2019 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा हा तिसरा अंतिम सामना आहे. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमवून विजेतेपदावर नाव कोरले होते.

सामन्याच्या प्रक्षेपणाची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार, सामन्याची सुरुवात दुपारी 3:30 वाजता होईल. पहिल्या दिवशी सामन्याचा टॉस दुपारी 3:00 वाजता होईल. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. तसेच, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) ॲप आणि वेबसाईटवर पाहता येईल.

ऑस्ट्रेलिया इतिहास रचणार की दक्षिण आफ्रिकेला मिळणार पहिले WTC विजेतेपद?

या अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल, तर द. आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या WTC विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल. हा सामना जिंकून पहिले मोठे आयसीसी विजेतेपद आपल्या नावे करण्याची संधी द. आफ्रिकेकडे आहे, ज्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

WTC अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका संघ : टोनी डी जॉर्जी, रायन रिकेल्टन, एडन मार्करम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.

ऑस्ट्रेलिया संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, मॅट कुहनेमन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT